१५ लाखांच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:34 AM2019-04-21T00:34:56+5:302019-04-21T00:35:28+5:30

मुंबईच्या एका स्टील व्यावसायिकाची फसवणूक करत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या सिन्नर येथून भिवंडीला पोहचविण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.

 Theft of 15 lakh iron rods | १५ लाखांच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा छडा

१५ लाखांच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा छडा

Next

नाशिक : मुंबईच्या एका स्टील व्यावसायिकाची फसवणूक करत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या सिन्नर येथून भिवंडीला पोहचविण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत गौळाणे रस्त्यावरून लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रेलरसह चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीतून भिवंडी येथील एका बांधकाम प्रकल्पावर वाहून नेणाऱ्या लोखंडी सळ्यांचा ट्रेलर अचानकपणे मार्ग बदलवून दुसºया ठिकाणी घेऊन गेल्याचे उदय ट्रान्सपोर्टचे उदयसिंग यांच्या जीपीएस तंत्रज्ञानामुळे लक्षात आले. त्यामुळे सिंग यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर (एमएच ४३ बीजी ६८८२) चोरी झाल्याची फिर्याद दिली. संशयित ट्रेलरचालक राजन सिंग, व्यावसायिक निसार खान उर्फ प्रधान व त्याचे चार मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा छडा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, रवींद्र सहारे, विजय लोंढे, राजाराम वाघ, रमेश घडवजे, देवकिसन गायकर आदींच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिसरात पाहणी केली. यावेळी गौळाणे शिवारात काही अज्ञात लोक ट्रेलर उभा करून लोखंडी सळ्या उतरवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने अब्दुलअहद मुस्तुफा खान (४२, रा. प्रशांतनगर, पाथर्डीफाटा), वकील मुस्लीम खान (३५), ध्रुपराज रामबरान यादव (२०), अल्लाऊद्दीन अय्युब खान (२४, तिघे रा. अंबड लिंकरोड, मूळ उत्तर प्रदेश) यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
नागरे-पाटील यांनी दिली ‘रॅकेट’ माहिती
शहरातून लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाºया ट्रेलरचालकांना हाताशी धरून संशयित चोरट्यांची टोळी निर्जन ठिकाणी ट्रेलरमधून लोखंडी सळ्या उतरवून चोरी करत असल्याची माहिती प्रथम पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखा युनीट-२च्या पथकाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देऊन नवा ‘टास्क’ दिला. पथकाने हा टास्क यशस्वीरीत्या पार पाडत लोखंडीसळ्या चोरी करणाºया चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

Web Title:  Theft of 15 lakh iron rods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.