आटकवडे येथे शेतपिकांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:35+5:302021-02-07T04:13:35+5:30
----------------------------------------- दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू सिन्नर-सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर न्यायलयासमोर दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून पडल्याने अंबड, नाशिक येथील युवकाचा मृत्यू झाला ...
-----------------------------------------
दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू
सिन्नर-सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर न्यायलयासमोर दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून पडल्याने अंबड, नाशिक येथील युवकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. शुभम मदन शिरसाठ (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. मयूर घोरपडे व शुभम शिरसाठ बजाज पल्सर दुचाकीने जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटून दुचाकीचा अपघात होऊन त्यात शुभम शिरसाठ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
------------------------------------------
बेवारस मृतदेह आढळला
सिन्नर : तलाठी कार्यालयासमोर मारुती मंदिराच्या प्रांगणात ४५ ते ५० वर्षे वय असलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळी ९ वाजताच्या सुमारास सदर मृतदेह आढळून आला. याप्रकरणी देवा अहिरे रा. पिंप्री रोड, सिन्नर यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस मृत व्यक्तीच्या वारसाचा शोध घेत आहेत.
----------------------------------------------------------
सागर सानप यांना सेवारत्न पुरस्कार
सिन्नर : तालुक्यातील मानोरी येथील युवा कार्यकर्ते सागर रामदास सानप यांना पुणे येथील शांतीदूत परिवाराच्यावतीने राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सागर सानप यांनी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयएएस अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव, दीपक पाटील, ज्ञानेश्वर महाराज वाबळे, आयपीएस अधिकारी डॉ. भाग्यश्री नवटके, डॉ. परीन सोमाणी, माधवराव सानप आदींसह मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------------
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा
सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित बालक मंदिर व प्राथमिक विद्या मंदिरात शिक्षकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा पार पडली. विद्याभारती शिशू वाटिका प्रमुख सदाशिव उपाले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर रुंठा प्राथमिक विद्यामंदिरच्या मोहिनी देवी, शरद जाधव, रावसाहेब गायधनी, अश्विनीकुमार येवला, हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, सविता कुलकर्णी, प्राचार्य सोपानराव येवले उपस्थित होते.