नळवाडीतून विद्युतपंपाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:31+5:302020-12-06T04:14:31+5:30
दिव्यांगांना घरकुलासाठी प्रहारचे आंदोलन सिन्नर : दिव्यांगदिनी दिव्यांगांच्या घरकुलासाठी नाशिक येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर सिन्नर ...
दिव्यांगांना घरकुलासाठी प्रहारचे आंदोलन
सिन्नर : दिव्यांगदिनी दिव्यांगांच्या घरकुलासाठी नाशिक येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांगांनी ठिय्या दिला. सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायती दिव्यांगांना घर व ५ टक्के निधी देण्यास विलंब करत आहे. अनेक आंदोलने केलि तरी दाद न मिळाल्याने तालुक्यातील दिव्यांगांनी शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले.
वडझिरे येथे दिव्यांग दिन
सिन्नर : तालुक्यातील वडझिरे येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. उपस्थित दिव्यांग बांधवांना शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामसेवक संदीप देवरे यांनी दिली. यावेळी अर्जुन बोडके, मनोहर बोडके, संजय बोडके, सुनील जगताप, संदीप आंबेकर, सुनील नागरे आदींसह ग्रामस्थ व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
आठवडे बाजारातून मोबाइलची चोरी
सिन्नर: तालुक्यातील वावी येथील आठवडे बाजारात अज्ञात चोरट्याने युवकाच्या खिशातील सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. सायाळे येथील स्वप्निल तुकाराम शिंदे हा युवक बाजार करीत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शिंदे याचा २० हजार रुपये किमतीचा मोबाइल खिशातून काढून घेतला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विधेयकांविरोधात मोर्चा
सिन्नर : केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विधेयकांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा व या विधेयकांचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ताालुक्यातील शेतकऱ्यांकडून सोमवारी (दि. ७) सकाळी ९ वाजता बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिर्डी रस्त्यावर अपघाताचा धोका
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, रुंदीकरणाचे कामे करताना पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी मुरुम आणि दगड रस्त्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी रेडियम व काम प्रगतिपथावर असल्याचे फलक नसल्याने धोका वाढला आहे.