सोनांबे येथून विद्युतपंपाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:26+5:302020-12-23T04:11:26+5:30
------------------- धार्मिक कार्यक्रम सुरू होणार असल्याने समाधान सिन्नर : कोविड नियमांचे पालन करून १०० श्रोत्यांच्या उपस्थितीत कीर्तन, प्रवचन या ...
-------------------
धार्मिक कार्यक्रम सुरू होणार असल्याने समाधान
सिन्नर : कोविड नियमांचे पालन करून १०० श्रोत्यांच्या उपस्थितीत कीर्तन, प्रवचन या धार्मिक कार्यक्रमांना राज्य शासनाने परवानगी दिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासनाने वारकरी सांप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या धर्मिक कार्यक्रमांना शंभर भाविकांच्या उपस्थितीत परवानगी द्यावी यासाठी वारकरी पाठपुरावा करत होते. राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला.
-------------------
शिर्डीकडे पायी दिंड्या सुरू
सिन्नर : गेल्या आठ महिन्यांपासून कोविडमुळे बंद असलेल्या पायी दिंड्या गेल्या आठवड्यापासून शिर्डीकडे कूच करीत असल्याचे दिसते. राज्य शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर सुरू झाले. त्यानंतर नाशिकसह मुंबई व उपनगरातील साईभक्त पायी दिंड्यांद्वारे शिर्डीकडे साईंच्या दर्शनासाठी येत असल्याचे चित्र आहे. पायी दिंड्यांमध्ये नेहमीपेक्षा पदयात्रेकरूंची संख्या मात्र कमी आहे.
---------------------
पक्षविरोधी कारवाया केल्याने कोतवाल यांची हकालपट्टी
सिन्नर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी काढले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांना यासंदर्भात पत्र पाठवून अवगत करण्यात आले आहे. सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकारबाबत टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
------------
कापड व्यावसायिक शुक्रवारचा बंद पाळणार
सिन्नर: कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय सिन्नर रेडिमेड व कापड व्यावसायिकांनी घेतला आहे. गणेशपेठेतील कालिका मंदिरात कापड व्यावसायिकांची बैठक पार पडली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आठवड्यातून एक दिवस बंद असावा, असे मत सर्वच व्यावसायिकांनी व्यक्त केले.