वीजपंपांची चोरी करणारे चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 03:52 PM2018-08-25T15:52:20+5:302018-08-25T15:52:29+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात शेतीच्या वीजपंपाची चोरीचे प्रमाण मोठे वाढले होते.त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालिदल झाला होता.कडवा,दारणा धरण परिसरातील जलसाठ्यालगतचे वीजपंप चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ होत होते. या पाशर््वभूमीवर घोटी पोलिसांनी गुप्त माहिती घेऊन दोघा संशयिताना ताब्यात घेतले.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात शेतीच्या वीजपंपाची चोरीचे प्रमाण मोठे वाढले होते.त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालिदल झाला होता.कडवा,दारणा धरण परिसरातील जलसाठ्यालगतचे वीजपंप चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ होत होते. या पाशर््वभूमीवर घोटी पोलिसांनी गुप्त माहिती घेऊन दोघा संशयिताना ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता,जवळपास चार ते पाच चोरी केलेल्या वीजपंप पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या.या संशयिताकडून जवळपास दोन लाखाची सामग्री जप्त केली आहे. याबाबत नामदेव दादा साबळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी घोटी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.घोटी पोलिसांनी भाऊराव राजाराम गिरंगे (२४) व सुनील धोंडू साबळे (२६) रा.अडसरे या सशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे,अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संतोष दोंदे,अनिल ढूमसे, लहू सानप,कोठुळे, प्रकाश कासार आदी करीत आहे.