‘देवराई’च्या वीजपंपाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:04 AM2019-07-13T01:04:08+5:302019-07-13T01:05:08+5:30

महापालिकेच्या माध्यमातून देवराईसारखा महत्त्वाकांक्षी पर्यावरण उपक्रम राबविला जात असताना समाजकंटकांकडून मात्र त्यास खोडा घालण्यात येत आहे. मुंबई नाका येथे साकारत असलेल्या देवराईतील पाणीपुरवठ्याच्या वीजपंपाची समाजकंटकांनी चोरी केली आहे.

 Theft of electricity of Devarai | ‘देवराई’च्या वीजपंपाची चोरी

‘देवराई’च्या वीजपंपाची चोरी

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून देवराईसारखा महत्त्वाकांक्षी पर्यावरण उपक्रम राबविला जात असताना समाजकंटकांकडून मात्र त्यास खोडा घालण्यात येत आहे. मुंबई नाका येथे साकारत असलेल्या देवराईतील पाणीपुरवठ्याच्या वीजपंपाची समाजकंटकांनी चोरी केली आहे. हा चांगल्या विधायक उपक्रमाला बाधा आणण्याचा प्रकार असून, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी देवराईची जबाबदारी घेणाऱ्या सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई नाका येथील दोन एकर क्षेत्रात देवराई फुलवण्याची जबाबदारी सोशल नेटवर्किंग फोरमने घेतली आहे. याठिकाणी ठिबक सिंचनासाठी लावलेल्या टाकीतील पाइप तोडून वीजपंप चोरून नेल्याचे आढळले.

Web Title:  Theft of electricity of Devarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.