दोन बुलेटसह चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:27 PM2020-03-11T23:27:26+5:302020-03-11T23:27:48+5:30

सिन्नर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन बुलेटसह चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. न्यायालयासमोर, विजयनगर येथील गुरुकृपा निवास येथून शनिवारी रात्री महेश अशोक आरखडे यांची बुलेट मोटारसायकल (क्र . एमएच १५ इसी ०८२८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

Theft of four wheels with two bullets | दोन बुलेटसह चार दुचाकींची चोरी

दोन बुलेटसह चार दुचाकींची चोरी

Next
ठळक मुद्देचोरट्यांकडून वाहनांमधील पेट्रोल काढण्याचेही प्रकार सर्रास घडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन बुलेटसह चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. न्यायालयासमोर, विजयनगर येथील गुरुकृपा निवास येथून शनिवारी रात्री महेश अशोक आरखडे यांची बुलेट मोटारसायकल (क्र . एमएच १५ इसी ०८२८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
याबाबत आरखडे यांनी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली आहे.
ऋ षिकेश भगवान क्षत्रिय यांची बजाज पल्सर दुचाकी (क्र. एमएच १५ एचडी ०६९४) कुंभार लेन येथून शनिवारी रात्री साडेनऊ ते रविवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान चोरीला गेली. तर वंजारी समाज मैदानातून हीरो-होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एमएच १५ इसी ३५९५) चोरून नेली. याबाबत दुचाकीमालक दिलीप काटे यांनी तक्रार दिली आहे.
विजयनगर भागातील ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव चांदोरे यांची बुलेट चोरट्यांनी बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून चोरून नेली. अ‍ॅड. चांदोरे पुण्याला सहकुटुंब गेले होते. त्यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांची बुलेट (क्र. एमएच १५, एफझेड ८८२७) नेली. चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सिन्नर शहरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांनी नागरिक हैराण झाले आहे. शहरातील चौका-चौकात रात्रीच्या वेळी उभ्या केलेल्या दुचाकींकडे चोरट्यांचा डोळा असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. शिवाय चोरट्यांकडून वाहनांमधील पेट्रोल काढण्याचेही प्रकार सर्रास घडत आहे.

Web Title: Theft of four wheels with two bullets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.