एसटीपीएलच्या व्यवस्थापनाकडून लोखंडी साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:05+5:302021-05-15T04:15:05+5:30
सिन्नरचे उपनगराध्यक्ष बाळू उगले, पंकज जाधव, रंजित उगले व योगेश मानकर यांना कंपनीतील लोखंडी उपयुक्त साहित्य आर्थिक फायद्यासाठी भंगारात ...
सिन्नरचे उपनगराध्यक्ष बाळू उगले, पंकज जाधव, रंजित उगले व योगेश मानकर यांना कंपनीतील लोखंडी उपयुक्त साहित्य आर्थिक फायद्यासाठी भंगारात नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सधारकांचे नुकसान होत होते. त्यावर उगले यांच्यासह कार्यकर्ते पाळत ठेवून होते. रविवारी (दि.९) दुपारी ४ वाजता कंपनीच्या गेटवर दोन ट्रक (क्र. एमएच १५ डीसी ३०३५ व एमएच १५ एके १९४२) या लोखंडी साहित्य विक्रीकरिता कंपनीचे मटेरियल गेटने समोरून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रात्री १० वाजता तीन ट्रक कंपनीत लोखंडी साहित्याची चोरी करण्याकरिता आल्याचेही उपनगराध्यक्ष बाळू उगले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या ट्रक अर्धवट लोखंडी साहित्याने भरल्या होत्या व साहित्य भरण्यासाठी दोन हायड्रा मशीन उभ्या होत्या. या ट्रक उगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात आणल्या.
उगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात एसटीपीएल व्यवस्थापनाच्या विरोधात लोखंडी साहित्य, वापरायोग्य मोठे पाण्याचे कटिंग पाइप अंदाजे २० ते २१ टन किंमत अंदाजे ८० ते ९० हजार किमतीचे लोखंडी साहित्य ट्रकमध्ये भरून चोरी करण्याच्या प्रयत्नात आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.