रिक्षा प्रवासात महिलेच्या दागिन्यांची चोरी

By admin | Published: May 22, 2017 02:34 AM2017-05-22T02:34:29+5:302017-05-22T02:47:31+5:30

नाशिक : रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ७५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली़

Theft of jewelery in a rickshaw ride | रिक्षा प्रवासात महिलेच्या दागिन्यांची चोरी

रिक्षा प्रवासात महिलेच्या दागिन्यांची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राजदूत हॉटेल ते मायको सर्कल यादरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ७५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली़
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मीना करणसिंग कच्छवा (रा़ रो-हाऊस नंबर ४, अनसाई हौसिंग सोसायटी, अशोकनगर, नाशिक) या शुक्रवारी घरी जाण्यासाठी राजदूत हॉटेलपासून रिक्षामध्ये बसल्या़ मायको सर्कलला पोहोचेपर्यंत रिक्षाचालक व पाठिमागे बसलेल्या भामट्यांनी त्यांच्या बॅगेची साखळी खोलून डब्यात ठेवलेले ६० हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १५ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे कानातले झुबे व ८०० रुपये रोख, असा ७५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी कच्छवा यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Theft of jewelery in a rickshaw ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.