गंगा गोदावरी मंदिरातील दागिने चोरीस

By admin | Published: November 22, 2015 10:53 PM2015-11-22T22:53:20+5:302015-11-22T22:54:18+5:30

गंगा गोदावरी मंदिरातील दागिने चोरीस

Theft of jewels in the temple of Ganga Godavari | गंगा गोदावरी मंदिरातील दागिने चोरीस

गंगा गोदावरी मंदिरातील दागिने चोरीस

Next

पंचवटी : घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करण्यापाठोपाठ आता चोरट्यांनी देवदेवतांच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही डल्ला मारण्यास सुरुवात केल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे.
रामकुंड येथे असलेल्या पुरातन गंगा गोदावरी मंदिरातील देवी मूर्तीच्या अंगावरील एक ग्रॅम वजनाचे दागिने, तसेच दानपेटीतील चिल्लर लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या भागात नागरिकांचा राबता मोठ्या प्रमाणात असतो. परंतु देवी मंदिरात अशी चोरी होत असेल तर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरट्यांनी देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने आता चोरट्यांच्या रडारवर मंदिरे असल्याचे दिसत आहे. गंगा गोदावरी मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी हेमंत तळाजिया यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रामकुंड येथे देवीचे मंदिर असून, शनिवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दोन्ही दरवाजांचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला व अंगावरील दागिने चोरले. त्यानंतर चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न केला; मात्र ती तोडता येत नसल्याने त्यातील अंदाजे बाराशे रुपयांची चिल्लर चोरून नेली.
पहाटेच्या सुमाराला काही ब्रह्मवृंद नेहमीप्रमाणे रामकुंडावर आल्यानंतर मंदिराचा दरवाजा उघडा दिसला व चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ मंदिराच्या पुजाऱ्यांना माहिती कळविली. या घटनेमुळे गोदाकाठावरील मंदिरांच्या सुरक्षितेच्या प्रश्नाविषयी चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Theft of jewels in the temple of Ganga Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.