घरफोडीमध्ये पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:14 AM2019-04-01T01:14:10+5:302019-04-01T01:14:25+5:30
मखमलाबाद रोडवरील एका सोसायटीमधील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रु पयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
पंचवटी : मखमलाबाद रोडवरील एका सोसायटीमधील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रु पयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडी प्रकरणी शिवनेरी प्राइड इमारतीत राहणारे सुजित प्रभाकर खांदवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. खांदवे हे शेतकरी असून, पिंपळनारे येथे शेतावर गेले होते. त्यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सुमारे सहा तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी इमारतीत राहणाऱ्या सदस्याला खांदवे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यानंतर त्यांनी खांदवे यांना माहिती दिली.
खांदवे घरी आले असता घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच सव्वा लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरफोडीची तक्र ार दाखल केली आहे. खांदवे यांना बागेचे पैसे मिळाले होते. रंगपंचमी असल्याने बँक बंद होती म्हणून सदर रोकड घरी ठेवली होती. सदरची रक्कम खत विक्रेत्यांना देण्यासाठी ठेवली असल्याचे समजते.
पोलीस निरीक्षकांची गस्त
मखमलाबाद रोडवरील शिवनेरी प्राइड इमारतीत गुरु वारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ज्या रात्री घरफोडी झाली त्या रात्री पंचवटी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रात्रपाळीवर गस्त घालत होते, असे समजते. पोलीस ठाणेप्रमुखाच्या आॅनड्युटीमध्ये लाखो रु पयांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आल्याने गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.