अभोण्याच्या ज्वेलर्सकडील चोरीतील लॉकर सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:12 AM2019-11-10T01:12:19+5:302019-11-10T01:13:24+5:30
अभोण्यातील मुख्य बाजार पेठेतील माउली ज्वेलर्स दुकान बुधवारी (दि.६) चोरट्यांनी फोडून लॉकरसह लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. त्यातील लॉकर तोडलेल्या अवस्थेत औरंगाबाद-नांदगाव रोडवरील तडगाव हद्दीत ग्रामीण पोलीस दलाच्या गस्ती पथकास मिळाले आहे.
अभोणा : अभोण्यातील मुख्य बाजार पेठेतील माउली ज्वेलर्स दुकान बुधवारी (दि.६) चोरट्यांनी फोडून लॉकरसह लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. त्यातील लॉकर तोडलेल्या अवस्थेत औरंगाबाद-नांदगाव रोडवरील तडगाव हद्दीत ग्रामीण पोलीस दलाच्या गस्ती पथकास मिळाले आहे. मात्र, त्यातील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, अभोणा पोलीस दलाचे दोन व जिल्हा ग्रामीण गुन्हे शोध पथकांमार्फत या घटनेतील चोरट्यांचा शोध घेतला जात असून, आरोपी लवकरच हाती लागतील, अशी माहिती अभोण्याचे सहायक निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी दिली.
ओणे येथून दुचाकी पळविली
ओझर टाउनशिप : घराच्या समोर ओट्यावर लावलेली दुचाकी चोरट्याने पळवून नेल्याची घटना ओणे येथे उघडकीस आली आहे. स्वप्निल कैलास हळदे यांनी त्यांची बजाज पल्सर (एमएच १५, जीजे ८८१९) बुधवारी (दि.६) रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरच्या ओट्यावर दुचाकी उभी केलेली होती. मात्र, गुरुवारी (दि.७) त्यांना ओट्यावर दुचाकी आढळली नाही. त्यानंतर हळदे यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली.