नांदगाव तालुक्यात पोषण आहाराची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:56 PM2022-06-25T23:56:38+5:302022-06-25T23:57:31+5:30
नांदगाव : तालुक्यातील मांडवड येथे अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील वस्तूंची चोरी झाल्याने येथे खळबळ उडाली आहे.
नांदगाव : तालुक्यातील मांडवड येथे अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील वस्तूंची चोरी झाल्याने येथे खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजित कैलास आहेर यांच्या मालकीच्या वाहनातून ( एम. एच. ०४ जी.आर. २७०४) मांडवड येथील अंगणवाडी मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील गहू, तांदूळ, मूगडाळ, चणा, वटाणा, साखर, तेल पिशवी बॉक्स, हळद, मीठ, मिरची मनमाड येथून घेऊन हे वाहन मांडवड येथे आणले. तेथे आहेर यांनी घरासमोर साहित्य उभी करून व ताडपत्रीने पूर्णपणे झाकून ठेवली.
सकाळी वाहनावर टाकण्यात आलेल्या ताडपत्रीचा काही भाग सोडलेला दिसल्याने व आतील वस्तूंची चोरी झाल्याचा संशय आल्याने, त्यांनी वस्तूंची, मालांची पाहणी केली. त्यातील तीन हजार तीनशे किमतीची ह्यअमृत मंथनह्ण या नावाच्या २२ सोयाबीन तेल पिशवी प्रत्येकी एक लीटर व १ हजार शंभर रुपये किमतीची लाल रंगाची गोणी त्यातील १० किलो वजनाची ११० रुपये दराची मूगडाळ असा एकूण चार हजार चारशे रुपये किमतीचा पोषण आहार चोरी गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी लागलीच तपास सुरू केला.
गावातीलच गणेश कौतिक थेटे यांच्या घरात सदर पोषण आहारातील मुद्देमाल घरात असल्याची खात्री झाल्याने थेटे यांच्या विरोधात अजित आहेर यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांत रीतसर फिर्याद दाखल केली असता, पोलिसांनी थेटे यास ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गांगुर्डे व चौधरी करीत आहे.