ठाणगाव येथे चंदनाच्या झाडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:35 AM2022-05-11T01:35:26+5:302022-05-11T01:36:13+5:30
आडवाडी रस्त्यालगत वरखाड मळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची झाडे (गर असलेला भाग) तोडून नेल्याने परिसरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. वनविभागाने सिन्नर तालुक्यात सक्रिय झालेल्या चंदनचोरांच्या वेळीच मुसक्या आवळा नाही तर त्यांचे फावेल. तेव्हा चंदनचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ठाणगाव : आडवाडी रस्त्यालगत वरखाड मळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची झाडे (गर असलेला भाग) तोडून नेल्याने परिसरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. वनविभागाने सिन्नर तालुक्यात सक्रिय झालेल्या चंदनचोरांच्या वेळीच मुसक्या आवळा नाही तर त्यांचे फावेल. तेव्हा चंदनचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाणगाव -आडवाडी रस्त्यालगत वरखाड मळा असून बाळासाहेब रंगनाथ बोऱ्हाडे यांच्या शेतातील गट नंबर १९ मधून स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीतून सात वर्षांपूर्वीचे चंदनाच्या झाडाचा खालचा भाग कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी कापून नेला आहे. झाडाच्या वरील भाग तसाच ठेवण्यात आला आहे. बोऱ्हाडे यांच्या शेताच्या शेवटच्या टोकाला वाहाळ असल्याने तिकडे सहसा कुणी जात-येत नाही. आज बोऱ्हाडे यांचा मुलगा किरण वावर नांगरण्यासाठी गेला असता सकाळी घडलेला प्रकार लक्षात आला. चंदनाचे झाड हे सकाळी तोडून नेले असल्याचे आढळले. चंदनचोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
----------------------
गेल्या अनेक दिवसापासून या भागात चंदनचोर सक्रिय असून, आतापर्यंत चार-पाच ठिकाणी चंदनाचे झाड चोरीच्या घटना घडल्या आहेत. चंदनाच्या झाडाची चोरी झाल्यावर तक्रार कुणाकडे करायची म्हणून शेतकरी तक्रार करण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे वनविभागाने या ठाणगाव परिसरातील चंदनचोराच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
------------------------------------