बाबो! प्रियकराच्या मदतीने पतीच्या घरात केली चोरी; मारला सहा लाखांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:01 PM2021-12-19T12:01:39+5:302021-12-19T12:05:27+5:30

नाशिकरोड - जेलरोड बेला डिसूजा रोड येथे पत्नीने दुसऱ्या पत्नीचा भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीच्या घराचे कुलूप दगडाने तोडून सुमारे ...

Theft of Rs 6 lakh from husband's house with the help of boyfriend in nashik | बाबो! प्रियकराच्या मदतीने पतीच्या घरात केली चोरी; मारला सहा लाखांवर डल्ला

बाबो! प्रियकराच्या मदतीने पतीच्या घरात केली चोरी; मारला सहा लाखांवर डल्ला

Next

नाशिकरोड - जेलरोड बेला डिसूजा रोड येथे पत्नीने दुसऱ्या पत्नीचा भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीच्या घराचे कुलूप दगडाने तोडून सुमारे सव्वासहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेला डिसूजारोड येथील अरुण सटवाजी साखरे यांनी फिर्याद दिली आहे. ते बुधवारी दुसरी पत्नी, मुलगा, मुलगी असे तपोवन एक्सप्रेसने मूळगावी जालन्यातील टेंभुर्णी येथे गेले होते. त्यांनी टेंभुर्णी येथे गेल्यानंतर पत्नीच्या आई-वडिलांना तिच्या प्रेमसंबंधाबाबतचे रेकाॅर्डिंग ऐकवत पहिल्या पत्नीचा प्रियकर नंदकुमार रायझाडे याच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबतची माहिती तिचे आई-वडील व भाऊ यांना दिली.

दरम्यानच्या काळात पहिली पत्नी, तिचा भाऊ व प्रियकर यांनी घराचे कुलूप दगडाने तोडून पाच लाख ५० हजारांची रोकड, ७० हजारांचे मंगळसूत्र, तीन मोबाईल, चार साड्या असा सहा लाख २८ हजाराचा ऐवज चोरून नेला. घर दुरुस्त करण्यासाठी बँकेतून चार लाख रुपये काढून घरात ठेवल्याची माहिती पत्नी नंदा, तिचा भाऊ सचिन साळवे व प्रियकर रायझाडे यांना होती. त्याचा फायदा घेत त्यांनी चोरी केल्याचा आरोप साखरे यांनी केला आहे. साखरे शुक्रवारी (दि. १७) काम आटोपून नाशिकला पोहोचले तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व लोखंडी कपाट उघडे दिसले. त्यानंतर त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा करण्यात आला आहे.

Web Title: Theft of Rs 6 lakh from husband's house with the help of boyfriend in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.