इंदिरानगरला चंदनाच्या झाडांची चोरी
By admin | Published: April 24, 2017 01:48 AM2017-04-24T01:48:31+5:302017-04-24T01:48:39+5:30
सिडको : इंदिरानगर येथील सिमेन्स कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी करून पलायन केल्याचा प्रकार घडला आहे
सिडको : इंदिरानगर येथील सिमेन्स कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी करून पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत येथील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वडाळा-पाथर्डीरोडलगत विराज सोसायटी व सिमेन्स कॉलनीत येथील रहिवाशांनी अनेक झाडे लावली आहेत, यात काही चंदनाची झाडे लावली आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक करवतीच्या साहाय्याने येथील मैदानात असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी केली. तसेच याच सोसायटीत राहणारे किशोर बेले यांच्या घरासमोरील चंदनाचे झाडेदेखील चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचवेळी घरात असलेले देवदत्ता बेळे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी ओरड करताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, याबाबत सोसायटीच्या रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे शासनाकडून झाडे लावण्याबाबत प्रबोधन केले जात असले तरी दुसरीकडे मात्र आहे. ती झाडे जगविणे व सुरक्षित ठेवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. याआधीचही चोरट्यांनी येथून आहे. चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)