राजापूर वन वसाहतीतून ट्रॉलीच्या चाकांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:54+5:302021-09-12T04:17:54+5:30

राजापूर गावात नेहमी छोट्या मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असताना नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण ...

Theft of trolley wheels from Rajapur forest colony | राजापूर वन वसाहतीतून ट्रॉलीच्या चाकांची चोरी

राजापूर वन वसाहतीतून ट्रॉलीच्या चाकांची चोरी

Next

राजापूर गावात नेहमी छोट्या मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असताना नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. या चोरीची तक्रार पोलिसांत दाखल करण्याची सूचना येवला वनक्षेत्रपाल अक्षय मेहेत्रे यांनी संबंधिताला दिली आहे. येथे वन विभागाची वसाहत आहे. या ठिकाणी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांचे ट्रॅक्टर जप्त करून या ठिकाणी ठेवले जातात. गेल्या कित्येक दिवसांपासून देवदरी येथील एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर वन वसाहत कॉलनीमध्ये जप्त केलेला होता. वन विभागाच्या नियमानुसार दंड व कायदेशीर बाबी पूर्ण करून वरिष्ठांचा आदेश देऊन ट्रॅक्टर घेऊन जावा असे पत्र वन विभागाच्या वनपाल मोहन पवार यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, त्याच दिवशी रात्री ट्रॉलीच्या दोन्ही चाकांची चोरी झाली आहे. मागे काही दिवसांपूर्वी राजापूर येथे गायत्री मेडिकल या दुकानाची हजारो रुपयांची चोरी झाली होती. या चाेरीचा अद्याप तपास लागलेला नाही. त्या अगोदर शिवाजी घुगे या शेतकऱ्याच्या १८ शेळ्या चोरीस गेल्या होत्या. येथील किराणा दुकानदार धनराज अलगट यांच्या किराणा मालाची चोरी झाली होती. या चोरीच्या सत्रामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो- ११ राजापूर

110921\11nsk_39_11092021_13.jpg

फोटो- ११ राजापूर 

Web Title: Theft of trolley wheels from Rajapur forest colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.