नांदूरशिंगोटे येथून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:51+5:302021-07-17T04:12:51+5:30
------------------------------------ पंचाळेत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा केलेल्या मदतीतून गावातील आदिवासी बांधवांच्या ...
------------------------------------
पंचाळेत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा केलेल्या मदतीतून गावातील आदिवासी बांधवांच्या वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. लोकवर्गणीच्या पैशातून दोन हजार लीटर्स टाकीचे लोकार्पण माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. राहुल आणि प्रीतेश मालपाणी या भावंडांनी बोअरवेलचे पाणी उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी यांचे सहकार्य लाभले.
-------------------------------
गोंदे विद्यालयास संगणक संच भेट
सिन्नर : तालुक्यातील गोंदे येथील मविप्र संस्थेच्या जनता विद्यालयास पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम निधीतून संगणक संच भेट देण्यात आला. मुख्याध्यापक पी.डी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सोईसुविधेसाठी आमदार तांबे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शिंदे यांच्या प्रयत्नातून विद्यालयास संगणक संच प्राप्त झाला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय तांबे, दिनकर तांबे, मनोहर तांबे उपस्थित होते.
---------------------------
‘मनाची सकारात्मकता विकासाचे बीज’
सिन्नर : ज्या व्यक्तींनी आयुष्यात ध्येय निश्चित करून, त्याप्रमाणे वर्तन केले, त्यांचाच विकास झालेला आहे. मनाची सकारात्मकता सर्वांगीण विकासाचे बीज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ यांनी केले. सिन्नर महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीत दुसरे पुष्प ‘मनोविश्लेषण’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. उपप्राचार्य डॉ.डी.एम. जाधव अध्यक्षस्थानी होते.
------------------------
वडझिरे येथे गरजू लोकांना साहित्य
सिन्नर : नाशिक येथील सामाजिक संस्था आशेचे द्वार प्रतिष्ठानमार्फत तालुक्यातील वडझिरे येथे गरीब व गरजू लोकांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. जवळच असलेल्या एमआयडीसीतील उद्योगही काही प्रमाणात बंद होते. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आशेचे द्वार प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरजवंतांना साहाय्य करते. या संस्थेमार्फत गरजू लोकांना किराणा साहित्य वाटप केले. यावेळी सरपंच सुनीता आंबेकर, संस्थेचे प्रतिनिधी संदीप भोसले, रमण कदम, आशिष फेलनस, जोशेफ पवार, जितेंद्र लोंढे, सचिन जाधव, प्रशांत खाविदया, प्रदीप लोंढे, जिल्हा सुपरवायझर रूपेश भोसले आदी उपस्थित होते.