शहरातून विविध ठिकाणांहून दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:20 AM2018-07-30T00:20:32+5:302018-07-30T00:20:49+5:30

शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी विविध परिसरांतून पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गंगापूर व पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे़

Theft of two wheelers from various places in the city | शहरातून विविध ठिकाणांहून दुचाकींची चोरी

शहरातून विविध ठिकाणांहून दुचाकींची चोरी

googlenewsNext

नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी विविध परिसरांतून पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गंगापूर व पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे़  गंगापूर रोडवरील चेतन जोशी यांची दुचाकी (एमएच १८, एएम ४९३६) चोरट्यांनी सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या झाडाखालून चोरून नेली़ पंचवटी हनुमानवाडीतील मैत्रीपुष्प अपार्टमेंटमधील रहिवासी आदित्य येनारे यांची दुचाकी (एमएच १५ जीएच ८४१५) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ वरवंडी येथील रहिवासी गोकुळ नवले यांची दुचाकी (एमएच १५, एफआर ३९५८) चोरट्यांनी रविवार कारंजावरील गोरेराम लेनमधून चोरून नेली़ दिंडोरी रोडवरील लामखडे मळ्यातील रहिवासी शंकर वाघमारे यांची दुचाकी (एमएच १५, सीएन ७२०३) चोरट्यांनी मार्केट यार्डातील चोरून नेली़ द्वारकाजवळील काठेगल्लीतील रहिवासी दीपक नराळे दुचाकी (एमएच १५ एफई ४४९५) चोरट्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराजवळून चोरून नेली़
दोघांना ताब्यात घेतले
सिटी सेंटर मॉलजवळील दुचाकी चोरीमध्ये गंगापूर पोलिसांनी संशयित वैभव आनंदसिंग पवार (२०, सिडको) व अमोल कोंडाजी बागुल (१९, रा. क्रांतीनगर) या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून पल्सर हस्तगत केली आहे़ तर पंचवटी पोलिसांनी संशयित आकाश दत्तू चारोस्कर व विकी किशोर बजाज या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ९७ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

Web Title: Theft of two wheelers from various places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.