‘त्यांच्या’ दुर्गावताराने चोरट्यांचे पलायन

By Admin | Published: October 25, 2016 11:56 PM2016-10-25T23:56:59+5:302016-10-25T23:57:34+5:30

उपनगर येथील घटना : महिलांच्या साहसाने वाचले इसमाचे प्राण

'Their' Durgavatara fleeing thieves | ‘त्यांच्या’ दुर्गावताराने चोरट्यांचे पलायन

‘त्यांच्या’ दुर्गावताराने चोरट्यांचे पलायन

googlenewsNext

उपनगर : येथील महाराष्ट्र बॅँकेसमोरील कॅनॉलरोडवर सोमवारी रात्री एका दुचाकीधारकाला अडवून त्यास मारहाण करीत पैशांची बॅग पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला दोघा महिलांनी कडाडून विरोध केल्याने त्या चोरट्यांना घटनास्थळावरून पलायन करावे लागले.
नाशिक येथील के. आर. ट्रेडर्सचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय असून, तेथील कर्मचारी अरुणकुमार हे सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास द्वारकेकडून उपनगर कॅनॉलरोडमार्गे जेलरोडला जात होते. ठिकठिकाणच्या दुकानदारांकडून वसुली करून २२ हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन अरुणकुमार अ‍ॅक्टिवा गाडीवर जात असताना गांधीनगर येथे दोन पल्सर दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याने त्यांना हुलकावणी देऊन पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत अरुणकुमार यांनी दुचाकी जोरात चालवत उपनगर महाराष्ट्र बॅँकेसमोरील कॅनॉलरोड मार्गाने निघाले.
कॅनॉलरोड झोपडपट्टीजवळ पुन्हा त्या दोन दुचाकीवरील पाच जणांच्या टोळीने अरुणकुमार यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यातील तिघा जणांनी हातातील लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैशांची बॅग व मोबाइल हिसकविण्याचा प्रयत्न केला. अरुणकुमार यांनी आरडाओरड केल्याने झोपडपट्टीजवळच उभ्या असलेल्या राधिका दाहिजे व सुनीता पगारे या दोन महिला घटनास्थळी धावून आल्या. त्यांनी त्या चोरट्यांना मारहाणीचे कारण विचारत चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील एकाने राधिका दाहिजे या महिलेस लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे संतप्त झालेल्या या दोन्ही महिलांनी तिघा युवकांना जोरदार प्रतिकार करत खाली पाडले. तोपर्यंत आजूबाजूचे नागरिक व महिला मदतीला धावत येत असल्याचे
पाहून तिघा चोरट्यांनी कशीबशी महिलांच्या तावडीतून आपली  सुटका करत इतर दोघा  चोरट्याच्या दुचाकीवरूनच धूम ठोकली.  राधिका दाहिजे व सुनीता पगारे या दोन्ही महिलांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरी करणाऱ्या त्या टोळीला पळून जाण्यास भाग पडले. सदर घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती
घेतली. (वार्ताहर)

 

Web Title: 'Their' Durgavatara fleeing thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.