... तर अनिश्चित काळासाठी दुकान बंदची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:15+5:302021-03-19T04:14:15+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, शहरातील परिस्थिती नक्कीच चिंता वाढविणारी आहे. जिल्ह्यातील काेरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने काही ...

... then the action of closing the shop indefinitely | ... तर अनिश्चित काळासाठी दुकान बंदची कारवाई

... तर अनिश्चित काळासाठी दुकान बंदची कारवाई

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, शहरातील परिस्थिती नक्कीच चिंता वाढविणारी आहे. जिल्ह्यातील काेरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घालून दिलेले आहेत त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. विनामास्क ग्राहकांशी व्यवहार केल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकानदाराचे दुकान अनिश्चित काळासाठी बंद केले जाईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची शिक्षा करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि.१८) कोरोनाचा आढावा घेतला. बैठकीप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहायक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, मनपा सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील अहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला पूर्वीप्रमाणेच कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या साधनसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या. शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी स्वैर वागणे सोडावे, आणि नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. लॉकडाऊन हा पर्याय कोणाच्याही फायद्याचा नसून त्याऐवजी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. लहान-लहान प्रतिबंधित क्षेत्रे (कन्टेन्मेंट झोन) तयार करुन घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर कारवाई पोलीस व मनपाने संयुक्तपणे करावी. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कोविडविरुद्धच्या या लढ्यात उतरून युद्धपातळीवर काम करत पंधरवड्यात यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

--इन्फो--

विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बसविण्याची शिक्षा करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. दुकानांमध्ये गर्दी होऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या असतानाही दुकानांसमोरील गर्दी कमी झाली नाही तर संबंधित दुकान प्रदीर्घकाळासाठी बंद ठेवण्याचा प्रसंगी त्याचे लायसन्स रद्द करण्याची कारवाईदेखील करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केली.

--इन्फो--

पॉझिटिव्हचा दर ३२ टक्के

सद्य:स्थितीत नाशिकला १०, ८५१ कोरोना रुग्ण आहेत. मागीलवर्षी १५ मार्च रोजी पॉझिटिव्हचा दर ४१ टक्के होता आता तो ३२ टक्क्यांवर आहे. जिल्हा रुग्णालयात एका दिवसाला ५ हजार स्वॅब तपासणीची क्षमता आहे. बिटको रुग्णालेयातही पाच हजार स्वॅब तपासणीची क्षमता आहे. येत्या रविवारी तेथे चाचणी घेतली जाणार आहे. रोज २० हजार तपासण्या करण्याची जिल्ह्यात क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे.

--इन्फो--

गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात सध्या काही निर्बंध असून, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचा गैरफायदा कुणी घेत असेल, नियमांचे पालन करणार नसेल तर कठोर कारवाई होणारच. दुकानदार असोत की भाजीविक्रेते, हॉटेल्सचालक, बार, ढाबाचालक यांनी उल्लंघन केल्यास होणारी कारवाई कठोर असेल, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

Web Title: ... then the action of closing the shop indefinitely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.