...तर मिळेल पोलिसांकडून नववर्षाचे गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:54 PM2020-12-30T22:54:16+5:302020-12-31T00:25:32+5:30

नाशिक : ह्यथर्टी फर्स्टह्णजल्लोषाच्या नावाखाली यंदा सार्वजनिकरीत्या एकत्र येत कुठल्याही प्रकारे आनंदोत्सव कोणालाही शहरात कोठेही साजरा करता येणार नसल्याचे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

... then get a New Year's gift from the police | ...तर मिळेल पोलिसांकडून नववर्षाचे गिफ्ट

...तर मिळेल पोलिसांकडून नववर्षाचे गिफ्ट

Next
ठळक मुद्दे३० ठिकाणी नाकाबंदी : नाइट कर्फ्यूची प्रभावी अंमलबजावणी; थर्टी फर्स्टचा जल्लोष घरातच हवा

नाशिक : ह्यथर्टी फर्स्टह्णजल्लोषाच्या नावाखाली यंदा सार्वजनिकरीत्या एकत्र येत कुठल्याही प्रकारे आनंदोत्सव कोणालाही शहरात कोठेही साजरा करता येणार नसल्याचे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आपआपल्या घरात राहून नववर्षाचा आनंद कुटुंबासमवेत घ्यावा, गुरुवारी (दि.३१) रात्री ११ वाजेपासून शुक्रवारी (दि.१) सकाळी सहा वाजेपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ३ हजार पोलीस रस्त्यावर राहणार आहे. एकूण ३० ठिकाणांवर कडक नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास, त्यास नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांकडून कारवाईचे ह्यगिफ्टह्ण दिले जाऊ शकते.

या वर्षी सर्वच सण उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. लॉकडाऊन शिथिल होऊन अर्थचक्राला गती मिळत असताना, काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भावही शहरात नियंत्रणात येत आहे. यामुळे कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिकरीत्या नाशिककरांनी थर्टी फर्स्टला एकत्र येणे टाळावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे. शहरात गुरुवारी रात्री ११ वाजेपासून तर थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही परिमंडळाचे उपायुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विशेष शाखा, महिला शाखांचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर पहारा देणार आहेत, तसेच सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस नियंत्रण कक्षाच्या ह्यॲलर्टह्णवर ठेवले जाणार असून, पेट्रोलिंग वाहने अधिकाधिक सक्रिय कसे राहतील, या दृष्टीने सूक्ष्मरीत्या नियोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (गुन्हे) संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दुकानांचे शटर ११ वाजता होणार डाऊन
शहरातील सर्व प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल यांचे शटर गुरुवारी रात्री ११ वाजता बंद होतील. जे दुकानदार याविरुद्ध कृती करताना आढळतील, त्यांच्यावर थेट गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.


घरगुतीच्या नावाखाली सार्वजनिक हुल्लडबाजी नको
इमारतीचे पार्किंग असो की टॅरेस, कोठेही सार्वजनिकरीत्या कोणीही परिरसरातील नागरिक एकत्र जमणार नाही, असेही निशाणदार यांनी स्पष्ट केले आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जर अशा प्रकारे कोठे ह्यहुल्लडबाजीह्ण दिसून आली, तर संबंधित सोसायटी किंवा इमारतीच्या अध्यक्ष व सचिवांनाही कारावाईला सामोरे जावे लागू शकते.

नशेबाजांवर पोलिसांचा ह्यवॉचह्ण
मद्यपी तरुणाईवर पोलिसांचा विशेष ह्यवॉचह्ण राहणार आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत शहरातील कानाकोपऱ्यात पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाईल. या नाकाबंदीत मद्यप्राशन करत किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: ... then get a New Year's gift from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.