... तर पुन्हा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:25 PM2020-06-09T22:25:14+5:302020-06-10T00:06:54+5:30
नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधील तिसºया टप्प्यात शहरात सम-विषम फॉर्म्युल्यासह बाजारपेठा खुल्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे नियोजन स्थानिक स्वराज्य संस्था करतील, असेदेखील त्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात बाजारपेठा सुरू झाल्यानंतर सम-विषम तारखेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढतच असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, हीच बाब प्रशासनासाठी चिंतेची बनली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ
असलेले मेनरोड, शालिमार, रविवार
कारंजा येथे सकाळपासूनच गर्दी होताना दिसते. त्याचप्रमाणे भद्रकाली, दूधबाजार, सराफ बाजार, दहीपूल, पंचवटी कारंजा याबरोबरच
नाशिकरोड, सिडको, सातपूर
भागात सर्वत्र बाजारांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी अशी स्थिती कायम राहिल्यास दुकानदारांना दिलेल्या सवलती पुन्हा मागे घेण्याची वेळ येऊ शकते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
-------------------
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सम-विषम नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. अन्यथा सवलती रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी