...तर आमचे जगणे होईल अधिक सोपे !

By admin | Published: November 30, 2015 11:59 PM2015-11-30T23:59:54+5:302015-12-01T00:01:37+5:30

आर्त हाक : बस भाड्यात सवलत ‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांना ठरेल आधार

... then our lives would be easier! | ...तर आमचे जगणे होईल अधिक सोपे !

...तर आमचे जगणे होईल अधिक सोपे !

Next

अझहर शेख , नाशिक
कुणाला सासर, माहेरचा आधार, तर कुणी एकाकीपणे जीवनाशी संघर्ष करत स्वत:चा व आपल्या ‘एचआयव्ही’ग्रस्त मुला-मुलींचे जिद्दीने संगोपन करून शहरातील एचआयव्हीग्रस्त महिलांचा परिस्थितीशी लढा सुरू आहे. बहुसंख्य एचआयव्हीग्रस्त महिला रोजगार व औषधोपचारासाठी घराचा उंबरा ओलांडण्याचे धाडस क रू लागल्या आहेत; मात्र आम्हाला बस भाड्यात निम्म्यापेक्षा अधिक सवलत मिळाल्यास आमचे जगणे अधिक सोपे होण्यास मदत होईल, अशी आर्त हाक यश फाउण्डेशन संस्थेच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या शेकडो एचआयव्हीग्रस्त महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांचा नोंदणीकृत आकडा सुमारे चौदा हजारांच्या जवळपास आहे. त्यामध्ये दोन वर्षांपासून ते सतरा वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या सुमारे सहाशे-सातशे आहे. एचआयव्ही बाधित महिला, पुरुषांसह मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याबरोबरच सकस आहार उपलब्ध करून देत एचआयव्ही व एड्सबाबत जनजागृती यश फाउण्डेशनच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर केली जात आहे. शहरात एचआयव्हीसह कुटुंबासमवेत जगणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. बहुसंख्य महिला मुलाबाळांसह स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच औषधोपचाराकरिता बाहेर पडणाऱ्या एचआयव्ही बाधित महिलांना वाहतुकीचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होत आहे.

‘त्या’ अनाथ बालकांना हवे केअर सेंटरचे वरदान

शहरासह जिल्ह्यात बहुतांश मुले-मुली एचआयव्हीसह जगत आहेत. पालकांकडून मुलांना आलेल्या एचआयव्हीचा आजार व दगावलेले पालक आणि आजी-आजोबा किंवा अन्य नातेवाइकांकडे राहणारे अनाथ एचआयव्हीग्रस्त बालकांना जगणे कठीण झाले आहे. त्यांच्यासाठी नाशिक जिल्ह्यात पुनर्वसन केंद्र (केअर सेंटर) शासनाकडून सुरू करणे गरजेचे असल्याचे मत एचआयव्हीग्रस्त महिलांनी व्यक्तकेले आहे. कारण अशा एचआयव्हीग्रस्त बालकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून, त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र वरदान ठरेल यात शंका नाही.

Web Title: ... then our lives would be easier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.