...तर चाराटंचाईचा प्रश्न
By admin | Published: December 4, 2014 11:52 PM2014-12-04T23:52:55+5:302014-12-04T23:53:35+5:30
...तर चाराटंचाईचा प्रश्न
नाशिक : अवकाळी झालेल्या पावसाने जिल्'ातील पिकांसह चाऱ्याची गुणवत्ता ढासळली आहे़ जर हा चारा खराब झाला तर लवकरच जिल्'ाला चाराटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्'ात खरीप हंगामात बाजरीचे पीक चांगले निघाले आहे; मात्र नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने जिल्'ात फळबागांसह हजारो हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे़ यामध्ये चारापीक म्हणून उपयोगात येणाऱ्या मका पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे़ भातपिकाची काढणी व डोंगर तसेच माळरानावरील गवताची कापणी सुरू असताना, झालेल्या अवकाळी पावसाने हा चारा भिजून गेला आहे़ हा चारा काही दिवसांतच कुजून जाण्याची शक्यता आहे़ जिल्'ात दोन कोटी २२ लाख सर्व प्रकारची जनावरे असून, त्यांना मे महिन्यापर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात आहे; मात्र पशुसंवर्धन विभागाच्या अंदाजित चाऱ्यामधीलच चारा अवकाळी पावसाने भिजून खराब झाला असल्याने चाराटंचाईला जिल्'ाला लवकरच सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़ जिल्'ातील काही भागात आतापासून पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे़ ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईसह चाराटंचाईचा सामना शेतकरी तसेच पशुपालकांना करावा लागणार आहे़