...तर सरकारचे काय करायचे ते पाहतो

By admin | Published: June 26, 2017 12:31 AM2017-06-26T00:31:45+5:302017-06-26T00:32:00+5:30

निफाड : कर्जमाफीसाठी एकजुटीने आंदोलन करणारा शेतकरी चोर गुन्हेगार नाही. त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या अन्यथा सरकारचे काय करायचे ते पहातो

... then sees what the government wants to do | ...तर सरकारचे काय करायचे ते पाहतो

...तर सरकारचे काय करायचे ते पाहतो

Next

उद्धव ठाकरे : नैताळे येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : कर्जमाफीसाठी एकजुटीने आंदोलन करणारा शेतकरी चोर गुन्हेगार नाही. त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या अन्यथा सरकारचे काय करायचे ते पहातो असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नैताळे येथील शेतकऱ्यांशी संवाद सांधतांना दिला. शेतकरी संपा दरम्यान आक्र मक आदोलन करणाऱ्या निफाड तालुक्यातील नैताळे गावाला रविवारी दुपारी एक वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते , पर्यावरण मंत्री रामदास कदम , ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे , निफाडचे आमदार अनिल कदम आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे म्हणाले सरकारचे नतद्रष्ट धोरणच शेतकऱ्यांच्या या अवस्थेला कारणीभुत आहे. या भागाला दुष्काळ आणि गारिपटीने मारल तर चांगला पाऊस होवुनही नोटबंदीने शेतीची वाताहत झाली. त्यामुळेच आपण आक्र मक होवुन आदोलन केले . तुमची ताकद सरकारला कळली आहे .आजची कर्जमाफीचा फायदा आपल्याला झाला नाही याची कल्पना आहे परंतु कुठुण तरी सुरवात करणे भाग होते. वंचीत शेतकऱ्यांसाठी सरकारला तातडीने समिती गठीत करायला सांगुन वंचीत शेतकऱ्यांसाठी वेळ पडल्यास सरकारच्या मानगुटीवर बसुन निर्णय करु ण घेऊ. मागण्या पूर्ण करायची जबाबदारी घेऊनच आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारने जर त्या पूर्ण नाही केल्या तर सरकारचे काय करायचे ते पाहू ,असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे जिल्हा प्रमुख भाउलाल तांबडे , जिल्हा परीषद अध्यक्ष शितल सांगळे जिप सदस्य बाळासाहेब क्षीरसागर , पंचायत समतिी सदस्य सोमनाथ पाणगव्हाणे ,संजय बोरगुडे , दादा बोरगुडे अरविंद बोरगुडे ,राजेंद्र बोरगुडे ,नवनाथ बोरगुडे , अशोक बोरगुडे , जावेद पठाण बापु बोरगुडे ,अशोक बोरगुडे बाबुराव शिंदे , शिवाजी तळेकर,रावसाहेब गोळे, बाळु खताळे , काकासाहेब मोगल आदींसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.


 

Web Title: ... then sees what the government wants to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.