...तर गृहविलगीकरण बंद करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:05+5:302021-04-29T04:12:05+5:30
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात आयोजित कोविड आढावा बैठकीत बनसोड बोलत होत्या. बरेच रुग्ण गैरसमजातून ...
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात आयोजित कोविड आढावा बैठकीत बनसोड बोलत होत्या. बरेच रुग्ण गैरसमजातून तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात येत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण दगावतात. मात्र, त्यांची माहिती प्रशासनासमोर येत नाही. अजूनही काही नागरिक लस टोचून घेण्यास राजी नाहीत. त्यासाठी समाजप्रबोधनाची गरज आहे. तालुक्यातील मोठ्या गावांतील योग्य ठिकाणी कोविड सेंटर करून तेथे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू करावेत. तसेच प्राथमिक व उपप्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी करण्याची सूचनाही बनसोड यांनी तहसीलदार किशोर मराठे यांना केली. माजी आमदार जे. पी. गावित यांनी कोविडसंदर्भात रुग्णांना येणाऱ्या अडचणी मांडून याठिकाणी ऑक्सिजन सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास मीना, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर, गटविकास अधिकारी भावसार, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, पोलीस अधिकारी राजेंद्र लोखंडे, सागर नांद्रे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इन्फो
ऑक्सिजन सिलिंडरचे आश्वासन
लीना बनसोड यांनी सुरगाणा, बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालय व पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील माहिती घेतली. सुरगाण्यासाठी पन्नास बेड व वीस जम्बो सिलिंडर त्वरित देण्याचे आश्वासन बनसोड यांनी दिले. याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची व्यापकता वाढविण्याचेही आवाहन केले.
फोटो- २८ सुरगाणा कोविड
सुरगाणा येथील आढावा बैठकीप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपविभागीय अधिकारी विकास मीना, तहसीलदार किशोर मराठे, माजी आमदार जे. पी. गावित, सभापती मनीषा महाले आदी.
===Photopath===
280421\28nsk_36_28042021_13.jpg
===Caption===
फोटो- २८ सुरगाणा कोविड