मग महापौरांवर गुन्हा का नाही?
By श्याम बागुल | Published: November 26, 2018 04:15 PM2018-11-26T16:15:03+5:302018-11-26T16:15:37+5:30
शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणा-या महापौरांनी मात्र
श्याम बागुल
नाशिक : घराच्या अंगणात कोणा तिºहाईताने कचरा आणून टाकला तर अंगाचा तिळपापड होऊन संबंधितांच्या वाडवडिलांचा उद्धार केला जातो, त्यातही जर कचरा टाकणाऱ्याची ओळख पटली तर प्रसंगी प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. अशी समाजाची मानसिकता असताना शहराच्या प्रथम नागरिकाच्या घरासमोरच अज्ञात व्यक्ती फटाक्यांचा कचरा करून पलायन करीत असेल तर त्याची दखल घेणे अधिकच क्रमप्राप्त ठरते. परंतु प्रथम नागरिकानेच या फटाक्यांच्या कचºयाबद्दल मौन पाळणे व कचरा आपण केलेलाच नाही, असा निर्वाळा देणे म्हणजे एकतर त्यांनी जाणूनबुजून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले किंवा फोडलेल्या फटाक्यांच्या कचºयाबाबत त्यांची कोणतीही तक्रार नाही, असे मानावे काय?
शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणाºया महापौरांनी मात्र घरासमोर फोडलेल्या फटाक्यांबाबत अनभिज्ञता दर्शवित, आपण फटाके न फोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत जे काही नियम, निकष ठरवून दिले ते डावलून ‘रामायण’च्या बाहेर फटाके फोडण्यात आल्याने त्याला जबाबदार धरून महापौरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका सामाजिक संस्थेने करून तशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे रामायण बंगल्याबाहेर फटाके कोणी फोडले हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो महापौरांनी फटाक्यासारखी जीविताला घातक वस्तू कोणी अज्ञाताने आपल्या निवासस्थानाबाहेर फोडूनही त्याकडे दुर्लक्ष करणे अधिक गंभीर आहे. मुळात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवून फटाके फोडणे हा जसा कायदेशीर गुन्हा आहे, तसाच त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात कुचराई करणे हादेखील कायदेशीर गुन्हाच आहे. घटनेत व कायद्यातही एखादे गैरकृत्य होत असताना त्याकडे जाणूनबुजून वा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे गुन्हा मानला गेला असताना या संदर्भात पोलिसांची भूमिकाही निश्चितच संशयास्पद आहे. महापौर यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात महापौरांनी मौन पाळणे व निवासस्थानाबाहेर फटाके फुटूनही त्याबाबतची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे तितकेच गरजेचे आहे. शहराचा प्रथम नागरिक आपल्या स्वत:च्या जीविताच्या संरक्षणासाठी इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत असेल तर शहरातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घ्यावी? आता खरी कसोटी आहे ती पोलिसांची, फटाके फोडणा-यांविरुद्ध गुन्हा तर दाखल आहेच, पण त्याची माहिती दडविणा-यांबाबत काय?