..मग, कर्जमाफीचे पैसे गेले कुठे? :  उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:17 AM2019-06-23T01:17:22+5:302019-06-23T01:18:11+5:30

मुख्यमंत्री कोण व्हावा, सत्तावाटप कसे असावे, हे आम्ही, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही. कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गेले कुठे,

 Then, where did the debt waiver go? : Uddhav Thackeray | ..मग, कर्जमाफीचे पैसे गेले कुठे? :  उद्धव ठाकरे

..मग, कर्जमाफीचे पैसे गेले कुठे? :  उद्धव ठाकरे

googlenewsNext

नांदगाव : मुख्यमंत्री कोण व्हावा, सत्तावाटप कसे असावे, हे आम्ही, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही. कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गेले कुठे, असा सवाल करत दोन निवडणुकांच्या मधल्या काळात कर्जमाफी, विमा योजनांचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नसतील तर त्या पोहोचवाव्यात, यासाठी महाराष्ट्रभर फिरून शिवसेना मदत केंद्र कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना केले.
ठाकरे यांचे चार तास उशिराने आगमन झाले. यावेळी त्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाला मोफत बियाणे व फवारणी पंपवाटप करण्यात आले. त्यानंतर मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी सांगितले, मिळालेली सत्ता आम्ही लोकांसाठीच वापरू. 
कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकºयांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गेले कुठे, असा प्रश्न करून ते म्हणाले की, विमा योजना अतिशय चांगली आहे. मात्र त्यात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या विम्याची रक्कम शेतकºयांना देत नसतील तर आम्ही ती वसूल करू. आमच्या सरकारच्या योजना नक्कीच चांगल्या आहेत. परंतु त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत. असे का घडते याची माहिती घेण्यासाठी तसेच शेतकºयांना कर्जमाफी मिळावी यासाठी व विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळावी अशा अनेक उद्देशांसाठी महाराष्ट्रभर शिवसेनेने मदत केंद्र उघडली आहेत. निवडणुका येतील आणि जातील, लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकांच्या मधल्या काळात शेतकरी कर्जमुक्त करावयाचा आहे. सामाजिक बांधिलकीतून शेतकºयांसाठी अनेक कामे शिवसेनेने सुरू केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर रवींद्र मिर्लेकर, खासदार हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, बापूसाहेब कवडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार जगन्नाथ धाञक, संभाजी पवार, मंगला भास्कर, भारती जाधव, नगराध्यक्ष राजेश कवडे, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, अलताफ शेख, चेअरमन तेज कवडे, पंचायत समिती सभापती विद्यादेवी पाटील, राजेंद्र आहिरे, माजी सभापती विलास आहेर, गणेश धात्रक, विष्णू निकम, नगरसेवक किरण देवरे, गटनेते सुभाष कुटे, अ‍ॅड. सचिन साळवे, प्रमोद शुक्ला, चंद्रकांत शिंदे, भास्करराव ठोंब, सुनील जाधव, फरान शेख, प्रमोद भाबड, दशरथ बच्छाव आदी उपस्थित होते.
विमा कंपन्यांना धडा शिकवू
आम्ही मुख्यमंत्रिपदाची गाजरं खात बसायची आणि ज्यांनी गाजरं पिकवायची तो शेतकरी मात्र उपाशीच राहायचा, असे होणार नाही. शिवसेनेने त्यांच्यासाठी मदत केंद्र उभी केली आहेत. १५ दिवसांत विमा कंपन्यांनी मदत केली नाही तर विमा कंपनींना धडा शिकवू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
...तर जुनी शिवसेना दाखवावी लागेल
यावेळी खासदार संजय राऊत यांनी सांगितले, सभागृहात घोषणा करून प्रश्न सुटत नाहीत. बँका पैसे देणार नसतील तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. पैसा देण्यात अडचणी निर्माण करणाºयांना जुनी शिवसेना दाखवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्याचा उल्लेख करून पीकविमा, पीक कर्ज, कर्जमाफी केवळ शिवसेनेच्या पुढाकारामुळे झाले. अगदी एक लाखाच्या ऐवजी दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली याचे श्रेय शिवसेनेला असल्याचे सांगितले. बापूसाहेब कवडे यांनी चारा छावण्यांना मिळणारी आर्थिक मदत तोकडी असून, बोंडअळीच्या अनुदानाची फक्त ४० टक्केच रक्कम लोकांना मिळाली. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे. ३५ हजार कोटींची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्यामुळे सरकारला करावी लागली असली तरी प्रत्यक्षात १३ हजार कोटीच मिळाल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी करंजवण पाणीपुरवठा योजनेत लोकवर्गणीचे ४८ कोटी रु पये शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.

 

Web Title:  Then, where did the debt waiver go? : Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.