...तर होणार पाणीकपात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:04 AM2019-07-15T02:04:15+5:302019-07-15T02:05:41+5:30
गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होताना दिसत असली तरी आता पुन्हा पावसाचा जोर कमी होऊ लागल्याने धरणसाठ्याचा अंदाज घेऊन पाणीकपातीचा निर्णय रद्द करू, असा पुनरुच्चार महाजन यांनी केला.
जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत गंगापूर धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या आधारे महाजन यांनी धरणातील पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबतचा आढावा घेतला जाईल, असेही सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीकपातीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. धरणातील घटलेला पाणीसाठा आणि महापालिकेला पाणी उचलण्यासाठी असलेली तांत्रिक अडचण यामुळे शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर दर गुरुवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे.
महासभेवर विषय
शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीचा विषय चर्चेचा असून, गुरुवारी होणारी सरसकट पाणीकपात रद्द करण्यासाठी विरोधकांची आग्रही भूमिका आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा यासाठी हा विषय येत्या १९ रोजी होणाऱ्या महासभेवर ठेवण्यात आलेला आहे.
आमदार फरांदे यांनीही वेधले लक्ष
जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूर धरणातील पाणी नियोजनासंदर्भातील चकीच्या धोरणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. नाशिकसाठी गंगापूर धरण हे १९५२ मध्ये बांधले गेले. धरणात आता मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणाची क्षमता ७२०० एमसीएफटी घटून आता ५६३० एमसीएफटी राहिली आहे. त्यात मृतसाठा मोजला जात नाही किंबहूना तशी तरतूद जलसंपदा विभागाने गंगापूरधरणाच्या