...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

By Admin | Published: August 14, 2014 10:12 PM2014-08-14T22:12:04+5:302014-08-15T00:53:25+5:30

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

... then you have to fight for independence again | ...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

...तर पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल

googlenewsNext

 

  प्रतिनिधी
 
नाशिक, दि. १४ : १५ आॅगस्ट हा आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानाचा दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती तरी स्वातंत्र्य-सैनिकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. परंतु अलीकडे हा दिवस उत्साहात, आनंदात साजरा करणे हळूहळू बंद होत आहे, याउलट एक सुट्टीचा दिवस म्हणून बरेचदा त्याकडे पहिले जात असल्याने आपण स्वातंत्र्यप्रती किती गांभीर्य बाळगुण आहोत, असा विचार करणे गरजेचे असल्याचे तरुणांनी सांगितले. देशाची सद्यस्थिती पाहता चांगल्या बाबींपेक्षा वाईट प्रवृत्तींनाच अधिक पाठबळ दिले जाते. भ्रष्टाचार कमी करण्याऐवजी तो वाढतच असल्याने देशाची प्रगती नव्हे तर अधोगती होत असल्याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे देशाची परिस्थिती बदलायला हवी. अन्यथा पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे तरुणांनी सांगितले. नव्या पिढीची ताकद
नवी पिढी विचार करणारी असून जी पिढी स्वत:च्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपला आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा देश ही घडण्याची अपेक्षा आहे. कुठलाही देश एका रात्रीत उभा राहत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागते, भारतात तर महापुरूषांनी यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे गरज आहे फक्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची. त्यासाठी संगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे याचा फारसा विचार न करता प्रयत्न करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणाला हे करणे शक्य नाही, हा दुर्बल विचार मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचे अमित निकुंभ यांनी सांगितले. महापुरूषांच्या विचाराची व्हावी आठवण
सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की कधी सबंध देश एका आवाजात ‘जय’ चा उदघोष करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरु षांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत काय? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील पण त्या सुंदर देशाचे स्वप्न साकार करण्याचा बदल प्रत्यक्षात येईल काय? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असल्याने आपल्याला पुन्हा महापुरूषांच्या विचाराची आठवण व्हायला हवी असे प्रशांत दिक्षीत यांनी सांगितले. निवडणुका म्हणजे
राष्ट्रीय सण
निवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सनासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आम्ही ही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नव्हे तर तब्बल गेल्या ६५ वर्षापासून ही पद्धत सुरू आहे. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वत:च्या स्वातंत्र्य साठी स्वत:लाच लढावे लागते, पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.

Web Title: ... then you have to fight for independence again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.