म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळाबाजार, साडे सात हजारांचे इंजेक्शन मिळते तीस हजारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:56+5:302021-05-20T04:15:56+5:30

नाशिकमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोरोनामुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसिस झाला होता. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळत आहेत. ...

There is also a black market of drugs for mucomycosis, thirty thousand people get seven and a half thousand injections | म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळाबाजार, साडे सात हजारांचे इंजेक्शन मिळते तीस हजारांना

म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळाबाजार, साडे सात हजारांचे इंजेक्शन मिळते तीस हजारांना

Next

नाशिकमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोरोनामुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसिस झाला होता. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळत आहेत. म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसचे यापूर्वी वर्षाकाठी चार ते पाच रुग्ण आढळून उपचारासाठी नाक, कान, घसा तज्ज्ञांकडे येत होते. तेथे आता दोन दिवसांत चार ते पाच रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागत आहे. कोरोनातून वाचल्यानंतर होणाऱ्या या भयंकर आजारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यासाठी लागणारे ॲम्फोटेरेसीन बी हे रुग्णालयात सुमारे साडे पाच ते साडे सात हजार रुपयांच्या एमआरपीत उपलब्ध आहे. परंतु सध्या रुग्णसंख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. एकेक इंजेक्शन तीस ते पस्तीस हजार रुपयांना मिळत आहे. बरे तर एकेका रुग्णाला किमान चाळीस इंजेक्शन्स द्यावी लागत असल्याने लाखो रुपयांच्या घरात खर्च जात आहे. या इंजेक्शन बरोबरच मायकोना, मायसेच, फोसोम ५० अशीही इंजेक्शन बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

इन्फो...

तज्ज्ञ काय म्हणतात...

कोट

म्युकरमायकोसिसवर आजारासाठी किमान चाळीस इंजेक्शन्स लागतात. काही वेळा तर शंभर इंजेक्शनदेखील द्यावी लागतात. पाच हजार रुपयांचे एक इंजेक्शन म्हटले तरी शंभर इंजेक्शनचे पाच लाख रुपये होतात. इंजेक्शनच्या टंचाईमुळे ते रुग्णांना मिळत नसल्याचे दिसत आहे.

- डॉ. पुष्कर लेले, नाक-घसा तज्ज्ञ

कोट...

डोळ्यांजवळ बुरशीजन्य आजाराचे लक्षण दिसते आणि डोळे लाल होऊन पाणीही निघते. अशी लक्षणे दिसताच तत्काळ कोरोनामुक्त झालेले रुग्ण येत आहेत. अगदी वीस वर्षांचा तरुणदेखील घाबरून येत आहे. मात्र सर्वांनी घाबरू नये, ज्या कोरोनाबाधितांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनाच म्युकरमायकोसिस होताना आढळत आहे.

- डॉ. सतीश पाटील, नेत्रराेग तज्ज्ञ

कोट...

दंतरोग तज्ज्ञांकडे म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, इंजेक्शन उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. शासनाने यासंदर्भात हस्तक्षेप करून तातडीने इंजेक्शनचा पुरवठा केला पाहिजे.

- डॉ. संजय भावसार, दंतरोग तज्ज्ञ

इन्फो...

पूर्वी महिन्याकाठी पाचशे आता दिवसाला हजार

यापूर्वी महिन्याला चारशे-पाचशे इंजेक्शनचा पुरवठा होत होता, मात्र गेल्या वर्षापासून अत्यंत वाढ झालेली आहे. कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या इतकी प्रचंड झाली आहे की किमान हजार इंजेक्शन तरी दिवसाकाठी लागू शकतात, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात शासकीय पातळीवरदेखील त्याची पुरेशी कल्पना नसून सध्या त्यासंदर्भात माहिती संकलित केली जात आहे.

इन्फो...

इंजेक्शन औषधी मिळेना..

१) म्युकरमायकोसिस आजाराची माहिती मिळाल्यानंतर नाक-कान-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंत तसेच मेंदुविकार तज्ज्ञांकडे रुग्ण वाढले. इंजेक्शन आणि औषधांची मागणी वाढली तरी त्याचा पुरवठा होत नाही.

२) इंजेक्शन्स वेळेत मिळत नाहीत तसेच औषधेही मिळत नाहीत. शहरातील तज्ज्ञांच्या रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी रुग्ण वेटिंगवर आहेत.

३) म्युकरमायकोसिस आजार झालेल्यांची संख्या निश्चित सांगता येत नसली तरी अनेक तज्ज्ञांनी ती हजारांच्या घरात असल्याचे सांगितले.

इन्फोे..

ओठ, नाक, जबड्याला फटका

- म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस (काळी बुरशी) याचा संसर्ग झाल्यानंतर अनेक रुग्णांना एक किंवा प्रसंगी दोन्ही डोळे गमावण्याची वेळ आली आहे.

- या आजाराचा संसर्ग तोंडाला झाल्यास आणि वेळीच उपचार न केल्यास ओठ, नाक आणि जबड्याला फटका बसू शकतो.

- बुरशीजन्य आजाराचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला आणि वेळीच शस्त्रक्रिया करून ती काढली नाही, तर जीवावर बेतू शकते.

इन्फो...

एका रुग्णाला लागतात चाळीस डोस...

- वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेका रुग्णाला किमान चाळीस इंजेक्शन द्यावेच लागतात. त्यात खंड पाडून चालत नाही.

- काही रुग्णांचे चाळीस इंजेक्शनच्या डोसवर भागत नाही, तर त्यांच्यासाठी शंभर इंजेक्शनपर्यंत संख्या वाढवावी लागते. त्यामुळे अडचण होते.

- यंदा तर इंजेक्शनची टंचाई असल्याने एका रुग्णाला चाळीस इंजेक्शन मिळविण्यासाठी मारामार आहे. शंभर इंजेक्शन तर दूरच राहिले अशी स्थिती आहे.

इन्फो..

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे बळी

५००

इंजेक्शन पूर्वी महिन्याला लागायचे

१०००

इंजेक्शन आता दिवसाला लागतात.

Web Title: There is also a black market of drugs for mucomycosis, thirty thousand people get seven and a half thousand injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.