अवैध वाहतुकीला लगाम लागणार का? नागरिकांचा सवाल : समांतर रस्त्यावरील प्रकार

By admin | Published: May 17, 2014 12:04 AM2014-05-17T00:04:57+5:302014-05-17T00:09:32+5:30

इंदिरानगर : मुंबई नाका ते दादासाहेब फाळके स्मारक समांतर रस्त्यादरम्यान अवैधरीत्या प्रवाशांची रिक्षातून होणारी वाहतूक आणि जीवघेणा प्रवास अद्यापही सुरूच आहे. या रस्त्यादरम्यान दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, वासननगर, पाथर्डीफाटा यांसह विविध उपनगरांचा समावेश आहे. त्यामुळे वाढत्या लोकवस्तीमुळे शहर वाहतुकीची बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक रिक्षांतूनच प्रवास करतात.

Is there any restriction on illegal transport? Citizen's question: Parallel road type | अवैध वाहतुकीला लगाम लागणार का? नागरिकांचा सवाल : समांतर रस्त्यावरील प्रकार

अवैध वाहतुकीला लगाम लागणार का? नागरिकांचा सवाल : समांतर रस्त्यावरील प्रकार

Next

इंदिरानगर : मुंबई नाका ते दादासाहेब फाळके स्मारक समांतर रस्त्यादरम्यान अवैधरीत्या प्रवाशांची रिक्षातून होणारी वाहतूक आणि जीवघेणा प्रवास अद्यापही सुरूच आहे. या रस्त्यादरम्यान दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, वासननगर, पाथर्डीफाटा यांसह विविध उपनगरांचा समावेश आहे. त्यामुळे वाढत्या लोकवस्तीमुळे शहर वाहतुकीची बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक रिक्षांतूनच प्रवास करतात.
समांतर रस्त्यावरून दररोज सुमारे ८० ते १०० रिक्षा धावतात. बहुतेक रिक्षाचालक मागील सिटवर सहा ते सात आणि चालकाशेजारी तीन ते चार प्रवासी बसवितात. तसेच अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक करताना बेफाम वेगाने रिक्षा धावतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. समांतर रस्त्यालगतच हाकेच्या अंतरावर शहर वाहतूक पोलीस विभागाचे कार्यालय आहे. तरीही सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून अवैधरीत्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. रिक्षातून होणारा जीवघेणा प्रवास तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Is there any restriction on illegal transport? Citizen's question: Parallel road type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.