येवल्यात १६७ मतदान केंद्रे

By admin | Published: February 19, 2017 11:35 PM2017-02-19T23:35:10+5:302017-02-19T23:35:49+5:30

येवल्यात १६७ मतदान केंद्रे

There are 167 polling stations in Yeola | येवल्यात १६७ मतदान केंद्रे

येवल्यात १६७ मतदान केंद्रे

Next

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मंगळवार दि. २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी तालुक्याच्या १५ गट-गणातील १ लाख ५० हजार मतदार १६७ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठीची निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या मतदान प्रक्रियेत अधिकाऱ्यांची नियुक्ती, सुविधा, मतपेट्या, प्रशिक्षण, वाहने, बंदोबस्त, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अशी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी चार कर्मचारी ठेवण्यात आले आहे. सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई (राठोड), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम यांनी लोकमतला दिली.  सोमवारी सकाळी ८ वाजता निवडणूक यंत्रणेच्या कामी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना येवला तहसील आवारात बोलावण्यात आले आहे. येथे कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मॉकपोलचे प्रात्यक्षिक दाखवून तयारी केली जाणार आहे. त्यानंतर २० बस, २० खासगी जीपमधून हे कर्मचारी मतदान केंद्रावर पाठवले जाणार आहेत. येवला पंचायत समिती व जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गटातून पाच जागांसाठी १९, तर पंचायत समिती गणाच्या १० जागांसाठी ४५ असे एकूण गट व गणाच्या रणसंग्रामात १५ जागांसाठी ६४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान यंत्राची गटासाठी शुभ्र मतपत्रिका व गणासाठी गुलाबी मतपत्रिका असलेली मतदान यंत्रे आहेत. या मशीनवर नोटाचा पर्यायदेखील मतदारांना उपलब्ध आहे. येवला तालुका गट गणाच्या या निवडणुकीसाठी एक लाख ५० हजार ६०४ मतदार एकूण १६७ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील. पाटोदागट व पाटोदा, धूळगाव गणासाठी ३२ मतदान केंद्रे, नगरसूलगट व नगरसूल, सावरगाव गणासाठी ३७ मतदान केंद्रे, राजापूरगट व राजापूर, सायगाव गणासाठी ३६ मतदान केंद्रे, अंदरसूलगट व अंदरसूल, नागडे गणासाठी ३० मतदान केंद्रे, मुखेडगट व मुखेड चिचोंडी गणासाठी ३२ अशी गटनिहाय मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र मांक एक, मतदान अधिकारी क्र मांक दोन, शिपाई आणि विभागनिहाय क्षेत्रीय अधिकारी यात १० टक्के राखीव कोटा धरून ११०२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर मतदान पथकांसह अधिकारी मतदान मशीन व सर्व साहित्यासह येवला तालुका क्रीडा संकुलात जमा करणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी गुरुवारी (दि. २३) तालुका क्रीडा संकुल येथील इमारतीत होणार आहे. मतमोजणीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रि येसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका यापूर्वीच वितरित करण्यात आलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी येवला तालुक्याची संपूर्ण प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. या निवडणुकीसाठी जास्तीजास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी विशाल राऊत, आर. बी. शिरसाठ, विजय शिंदे, ए. डी. शंकपाळे, दत्ता गुंजाळ यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहे. (वार्ताहर)

Web Title: There are 167 polling stations in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.