आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने रोहयो मजुरांची खाती आता पोस्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:56 PM2020-06-16T21:56:44+5:302020-06-17T00:20:21+5:30

नाशिक : रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी बॅँकेत जमा केली जाते. तथापि, आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने मजुरांना बरेच अंतर पार करून बॅँक असलेल्या ठिकाणी जावे लागते. त्यांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता रोहयो मजुरांची खाती ‘पोस्ट पेमेंट बॅँकेत’ उघडण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

As there are no banks in the tribal areas, the accounts of Rohyo workers are now in the post | आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने रोहयो मजुरांची खाती आता पोस्टात

आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने रोहयो मजुरांची खाती आता पोस्टात

Next

नाशिक : रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी बॅँकेत जमा केली जाते. तथापि, आदिवासी क्षेत्रात बॅँका नसल्याने मजुरांना बरेच अंतर पार करून बॅँक असलेल्या ठिकाणी जावे लागते. त्यांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता रोहयो मजुरांची खाती ‘पोस्ट पेमेंट बॅँकेत’ उघडण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत मजुरांची खाती टापाल खात्याच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’मध्ये उघडण्याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार, सहगट कार्यक्रम अधिकारी तसेच पंचायत समित्यांना देण्यात आले आहेत. कोविड-१९चा प्रभाव लक्षात घेता रोहयो योजनेवर काम करणाºया आदिवासी मजुरांना वेळीच मजुरी मिळावी यासाठी आदिवासी विभागाच्या प्रकल्प संचालकांनी आयोजित केलेल्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता.
बहुतांश आदिवासी क्षेत्रात बॅँका उपलब्ध नसल्याने अनेक मजुरांना बरेच अंतर कापून बॅँक गाठावी
लागते. यामुळे मजुराला त्रासही सहन करावा लागतो. मजुरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.
--------------------

Web Title: As there are no banks in the tribal areas, the accounts of Rohyo workers are now in the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक