तासाभरात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:31 AM2017-09-15T00:31:29+5:302017-09-15T00:31:54+5:30

पोलिसांना आव्हान : शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही चोरटे फरार; खुलेआम लूट नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आव्हान दिले.

There are six sunshades in the hour | तासाभरात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या

तासाभरात सहा सोनसाखळ्या ओरबाडल्या

Next

पोलिसांना आव्हान : शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही चोरटे फरार; खुलेआम लूट

नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी ओरबाडून जणू पोलिसांना पुन्हा आव्हान दिले.
ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवामध्ये अशोका मार्ग, रविशंकर मार्गसह आदी परिसरांत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. तसेच आगामी नवरात्रोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असताना शहरात सोनसाखळी चोरीच्या तासाभरात सहा घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सर्वत्र पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये नाकाबंदी केली जात असूनही एकही सोनसाखळी चोर पोलिसांना गळाला लागलेला नाही हे विशेष! आजच्या घटनांमध्ये प्रत्यक्षदर्शी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार सोनसाखळीचोर दुचाकीवरून हेल्मेट परिधान करत आले आणि सोनसाखळी गळ्यातून हिसकावून पळ काढला. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी तपोवनरोडवर घडली. शकुंतला पाटील (५३) या पायी जात असताना दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी येऊन त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली त्यावेळी झाडीची फुले तोडत होत्या. एक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.गंगापूररोड परिसरात अशा घडल्या घटनापहिल्या घटनेत फिर्यादी चंदा पुखराज जैन (५९.रा. संचेती कॉम्पलेक्स, पंपिंग स्टेशन) या कॉलेजरोडवरील विठ्ठल मंदिर चौकातून गंगापूररोडकडे दुपारी जात असताना नामको बॅँकेसमोर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन चोरट्यांनी येऊन गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. दुसरी घटना त्यापाठोपाठ याच परिसरात घडली. मालती रामचंद्र देवरे (५०,अष्टविनायक टॉवर, थत्तेनगर) यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र अशाच पद्धतीने चोरट्यांनी हिसकावले, तर तिसºया घटनेत उषा हरिभाऊ थेटे (इंद्रप्रस्थ सोसा. विद्याविकास सर्कल) यांच्या गळ्यातील १८ ग्रॅमची सोनसाखळी चोरट्यांनी पळविली. चौथी घटनाही गंगापूररोड परिसरातच घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
सावरकरनगर परिसरातील रहिवासी पुष्पा श्रीकृष्ण कुलकर्णी (६९) या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Web Title: There are six sunshades in the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.