नोटांबाबत अशा आहेत मार्गदर्शक सूचना

By admin | Published: November 10, 2016 11:59 PM2016-11-10T23:59:20+5:302016-11-10T23:55:41+5:30

नोटांबाबत अशा आहेत मार्गदर्शक सूचना

There are such notes regarding the notes | नोटांबाबत अशा आहेत मार्गदर्शक सूचना

नोटांबाबत अशा आहेत मार्गदर्शक सूचना

Next

नाशिक : शासनाने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर त्यासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
 जुन्या चलनातील नोटा या खातेदारास त्याच्या बॅँक खात्यामध्ये किंवा रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांच्याकडे ३० डिसेंबरपर्यंत जमा करता येऊ शकतील. रुपये चार हजारपर्यंतची जुन्या चलनातील रक्कम विनंती अर्जाच्या स्लीपसह व ओळखपत्र जोडून बॅँकेत किंवा रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाकडे जमा करता येऊ शकतील. ही सुविधा सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. चार हजार रुपयांची मर्यादा वाढविण्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत आढावा घेऊन घेतला जाईल.
ज्या बॅँक शाखेत व्यक्तीचे खाते आहे त्या बॅँक शाखेच्या खात्यामध्ये स्वत: रक्कम जमा करण्यास बॅँक खातेदारास उच्चतम रकमेची मर्यादा नाही, तथापि ज्या प्रकरणांमध्ये खातेदाराचे केवायसी झालेले नाही अशा परिस्थितीत पन्नास हजार इतक्या मर्यादेतच जुन्या चलनाच्या नोटा जमा करता येतील.
त्रयस्त व्यक्तीच्या बॅँक खात्यावर जुन्या चलनातील नोटा जमा करायच्या असल्यास अशा परिस्थितीत मूळ खातेदाराचे अधिकृत पत्र, ओळखपत्र जोडून अशी रक्कम जमा करता येऊ शकेल.
बॅँक खातेदारास २४ नोव्हेंबर रोजी संपणाऱ्या पंधरवड्यापर्यंत दहा हजार रुपये एका वेळी परंतु वीस हजार रुपये प्रति आठवड्याच्या मर्यादेत रोख रक्कम बॅँकेतून उचल करता येईल. दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगात असलेली नॉन कॅश व्यवहारावर कोणतेही निर्बंध नाहीत. म्हणजेच धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट, डेबिट कार्ड, मोबाइल व्हॅलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले व्यवहार सुरळीत राहतील.
 दि. १८ नोव्हेंबरपर्यंत खातेदारास त्याच्या एटीएममधून प्रति दिवशी दोन हजार रुपये प्रति कार्ड यानुसार रक्कम काढता येईल, १९ नोव्हेंबर २०१६ नंतर ही मर्यादा वाढवून चार हजार रुपये प्रती कार्ड याप्रमाणे रक्कम काढता येईल.
दि. ३० डिसेंबर २०१६ पर्यंत ज्यांना बॅँकेमध्ये किंवा रिझर्व्ह बॅँकेमधून जुन्या चलनातील नोटा बदलून घेता आलेल्या नाहीत अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅँकेच्या विशिष्ट कार्यालयांमध्ये ती बदलून घेण्याची व्यवस्था उपलब्ध असेल.
 दि. ११ नोव्हेंबर रात्री बारापर्यंत जुन्या चलनातील बदलामुळे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासकीय रुग्णालये, शासकीय रुग्णालयातील औषधालये, रेल्वे तिकीट खिडकी, शासकीय सार्वजनिक वाहतुकीचे तिकीट घर आणि वायुसेवेची तिकीट खिडकी, ग्राहक सहकारी सोसायटी, दुग्धालये, पेट्रोल पंप अशा ठिकाणी जुन्या चलनातील नोटा वापरात येऊ शकतील.
 आज मितीस सर्व बॅँकांकडे चार ते पाच दिवस पुरेल इतके ५०, १०० चे चलन उपलब्ध आहे. याशिवाय रिझर्व्ह बॅँकेकडे तीन दिवस पुरेल इतका चलन साठा उपलब्ध आहे. रिझर्व्ह बॅँकेने तीन गाड्या व तीन अतिरिक्त अधिकारी चलन पुरवठ्यासाठी सज्ज ठेवले आहे.
 दि. ११ नोव्हेंबरपासून बॅँक कामाचा बोझा लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या एक तास अगोदर बॅँकेत कामकाजाकरिता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 बॅँकेकडील अतिरिक्त कामाचा बोझा लक्षात घेऊन सर्व बॅँक शाखांमध्ये अतिरिक्त काउंटर्स व अतिरिक्त कारकून देण्याची सूचना देण्यात आली आहे.
 पर्यटनस्थळी पर्यटकांना
आवश्यक चलन उपलब्ध नसण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पर्यटन क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे.

Web Title: There are such notes regarding the notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.