‘ई-पास’साठी कारणं दोनच; अंत्यसंस्कार किंवा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:04+5:302021-05-04T04:07:04+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासाची अत्यावश्यक ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासाची अत्यावश्यक कारणे असल्यास पोलिसांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी १८ आंतरजिल्हा सीमांवरील आठ तपासणी नाक्यांवर चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. तपासणी नाक्यांवर फिक्स पॉइंट सक्रिय करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक गरजेच्या कारणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करावयाचा असल्यास नाशिक पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ‘ई-पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ई-पास’ प्राप्त झाल्यानंतरसुद्धा प्रवासाकरिता असलेली वाहने आणि त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.
---इन्फो--
...ही कागदपत्रे हवीत
ई-पास मिळविण्याकरिता स्वत:चा फोटो, पत्त्याचा किंवा ओळखीचा अधिकृत पुरावा असलेल्या कागदपत्राची स्कॅन कॉपी, आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची स्कॅन कॉपी ही मूळ कागदपत्रे अत्यावश्यक असतात.
ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करताना वरील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक ठरते. तसेच विहित नमुन्यामध्ये जेथून प्रवास करायचा आहे, तेथील पत्त्यासह ज्या जिल्ह्यात प्रवास संपणार आहे, तेथील पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. तसेच ज्या वाहनातून प्रवास करणार आहात, त्या वाहनाचा आरटीओकडील नोंदणी क्रमांक, चालकाचे नाव, सहप्रवासी संख्या आदी माहिती भरावी लागते. तसेच परतीच्या प्रवासाचा दिनांक आणि परतीच्या प्रवासातील प्रवाशांची संख्याही नमूद करावी लागते.
---इन्फो--
‘ई-पास’साठी असा करावा अर्ज
https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर सर्वप्रथम अर्जदाराने भेट द्यावी. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे संकेतस्थळ खुले होते. ‘ट्रॅव्हल पास’चा विहित नमुना अर्ज दिसतो. त्यामध्ये आपण राहत असलेला जिल्हा किंवा शहर सर्वप्रथम निवडावे. त्यानंतर आपले पूर्ण नाव, प्रवास करण्याचा दिनांक, मोबाइल क्रमांक, प्रवासाचे कारण, प्रवासाचा उद्देश, वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल आयडी, प्रवास प्रारंभ ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या, प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा पत्ता आदी माहिती भरणे बंधनकारक आहे. यानंतर आवश्यक ती वरील कागदपत्रे स्कॅन कॉपी आवश्यक त्या मर्यादित आकारात अपलोड करावी आणि ‘सबमिट’वर क्लिक करावे.
--इन्फो--
२४ तासांच्या आत मिळतो ई-पास
अर्ज केल्यानंतर अर्जदाराला एक टोकन क्रमांक प्राप्त होतो. या टोकन क्रमांकाद्वारे त्याच्या अर्जाच्या मंजुरीची सद्यस्थिती त्याला त्याच संकेतस्थळावर ‘चेक स्टेटस’वर क्लिक करून तपासता येते. २४ तासांमध्ये ग्रामीण किंवा शहर पोलिसांकडून ऑनलाइन अर्जाला मंजुरी मिळते आणि ई-पास संबंधिताला देण्यात येतो. हा ई-पास संकेतस्थळावरून ‘डाऊनलोड’ या पर्यायावर क्लिक करून मिळविता येतो. पीडीएफ स्वरूपात अर्जाची प्रत प्राप्त होते.
---
डमी फॉरमेट आर वर ०३ई-पास रिझन नावाने व फोटो ०३पोलीस व ०३ई पास नावाने सेव्ह आहेत.
===Photopath===
030521\03nsk_15_03052021_13.jpg~030521\03nsk_17_03052021_13.jpg
===Caption===
ई-पास असा मिळवा~ई-पास असा मिळवा