स्वच्छतेच्या सादरीकरणासाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:24 AM2018-08-06T00:24:59+5:302018-08-06T00:25:34+5:30

जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्र म सुरू झाला असून, या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

There are villages for cleanliness | स्वच्छतेच्या सादरीकरणासाठी गावे सरसावली

स्वच्छतेच्या सादरीकरणासाठी गावे सरसावली

Next
ठळक मुद्देगावा गावात स्वच्छता मोहीम सुरू

जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्र म सुरू झाला असून, या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
आपण केलेल्या स्वच्छतेच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी गावे सरसावली असून, प्रभातफेरी, गाव स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्त अभियानाने सुरुवात झाली असून, नागरिकांनी आपल्या गावाला व जिल्ह्याला सन्मान देण्यासाठी या स्वच्छता मोहिमेत
सक्रि य सहभाग नोंदविण्यासाठी गावा गावात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.
गावोगावी सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता, प्रभावी व्यक्तींची मते व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रि या घेतल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणासाठी एसएसजी १८ हे मोबाइल अ‍ॅप केंद्र शासनाकडून गूगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त लोकांनी ते डाउनलोड करून प्रतिक्रि या नोंदविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे. येवला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यात आपला सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.स्वछ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ च्या दृष्टीने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्याचा सन्मान वाढविण्यासाठी योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. यात गावातील प्रभावशाली व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या प्रतिक्रि या व आॅनलाइन अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. सर्वांनी यात आपला सहभाग नोंदवावा. - बाळासाहेब बोराडे, ग्रामसेवक, जळगाव नेऊर

Web Title: There are villages for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक