खात्यातून परत गेलेले पैसे पुन्हा आल्याच्या खात्रीबाबत साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:07 AM2019-03-07T01:07:04+5:302019-03-07T01:07:35+5:30
नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या शेतकºयांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा झाले किंवा नाही याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने सरकारची घोषणा चुनावी जुमला ठरण्याची टीका होऊ लागली आहे.
नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या शेतकºयांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा झाले किंवा नाही याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने सरकारची घोषणा चुनावी जुमला ठरण्याची टीका होऊ लागली आहे. योजनेबाबत शेतकºयांच्या तक्र्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे करण्यात आलेले आवाहन दिशाभूल करणारे ठरले आहे. (पान ४ वर) वारंवार संपर्क करूनही या योजनेबाबत माहिती देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही सक्षम अधिकारी समोर आला नाही. (पान ? वर)
२४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान योजनेचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचा शुभारंभ केला. दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकºयांची संख्या नाशिक जिल्ह्णात सुमारे साडेतीन लाखांच्या आसपास असून, त्यातील पहिल्या टप्प्यात काही शेतकºयांच्या खात्यावर दोन हजार रुपये त्याच दिवशी जमा झाले, तसे लघुसंदेशही संबंधित बॅँकांकडून शेतकºयांना देण्यात आले. परंतु जिल्ह्णातील १८६ शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले पैसे अवघ्या काही वेळातच बॅँकांनी पुन्हा परत घेऊन आपल्याकडे जमा करून घेतले. याबाबत शेतकºयांनी बॅँकांना विचारणा केली असता बॅँकांनी हातवर करून सदरचे पैसे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडे बोट दाखवून हात झटकले. कृषी विभागाकडेदेखील याची काही माहिती नाही तर महसूल खात्यानेही याबाबत माहिती नसल्याचे सांगून आपली मान सोडवून घेतली. ज्या शेतकºयांच्या खात्यातील पैसे परत काढण्यात आले अशा शेतकºयांची नावे, बॅँकेचे खाते क्रमांक, आधार क्रमांक याची खात्री पुन्हा स्थानिक पातळीवरून करण्यात आल्यानंतर जवळपास १२२ शेतकºयांची माहिती पुन्हा आॅनलाइन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडे पाठविण्यात आली आहे. परंतु या शेतकºयांना पैसे मिळाले की नाही याची खात्री करण्याची कोणतीही सोय स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकºयांकडून या योजनेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. खात्यात जमा झालेले पैसे पुन्हा काढून घेतलेले अशोक लहामगे या शेतकºयाशी संपर्क साधला असता त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.
गॅस सबसिडीबाबत दिलगिरी
घरगुती गॅस सिलिंडरची बॅँक खात्यात जमा होणारी रक्कम पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दाखविण्याचा प्रताप सरकारने केला असून, गेल्या आठवड्यात गॅस ग्राहकाच्या १११५१२८ कॅशमेमोधारकाच्या खात्यावर जमा झालेले १५५.९५ रुपये बॅँक खात्यात जमा करताना चक्क पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दाखविण्यात आले होते. सरकार शेतकºयांना दोन हजार रुपये देत असताना गॅस ग्राहकाला फक्त १५५ रुपयेच जमा झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच, बॅँकेने दुसºया दिवशी लघुसंदेशाद्वारे दिलगिरी व्यक्त करून सदरचे पैसे किसान योजनेचे नसल्याचा खुलासा केला आहे.