निवृत्तिनाथांची वारी झाली लाखाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:13 PM2019-07-10T23:13:59+5:302019-07-10T23:14:45+5:30
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोचेपर्यंत वारकºयांची ही मांदीयाळी दीड लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.
धनंजय रिसोडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखांहून अधिक वारकऱ्यांपर्यंत मजल मारली आहे. अजून अखेरचे दोन मुक्काम बाकी असून, गावोगावच्या दिंडींमधील वाढते प्रमाण पाहता पंढरीत पोहोचेपर्यंत वारकºयांची ही मांदीयाळी दीड लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.
ज्ञानोबा माउलींचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीलादेखील माउली आणि तुकोबामहाराजांच्या पालखीइतकाच मान आहे. या दोन पालख्यांमध्ये वर्षानुवर्ष सहभागी होणाºया वारकºयांची संख्या ४ ते ५ लाखांच्या घरात असते. मात्र, त्र्यंबकेश्वरच्या समाधी स्थानापासून निघणारी निवृत्तिनाथ महाराजांची पालखी अधिक लांबून पंढरीत जात असूनदेखील या पालखीत सहभागी वारकºयांची संख्या कधी एक लाखाच्या पल्याड पोहोचली नव्हती. पण यंदा मात्र पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेपर्यंतच सव्वा लाखाच्या वर पोहोचली आहे. पंढरपूरपर्यंत ही संख्या यंदा दीड लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे.‘निर्मल वारी’ अशक्यमाउली आणि तुकोबांच्या पालखीसह निवृत्तिनाथ महाराज आणि सोपानकाका पालखी यादेखील शतकानुशतके चालणाºया पालख्यांची शासनदरबारी नोंद आहे. या दोन पालख्यांसमवेत शासनाकडून अनेक मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ही सुविधा असल्याने त्या पालखीत सहभागी वारकºयांना ‘निर्मल वारी’ करणे शक्य होत आहे. मात्र, निवृत्तिनाथ पालखीसमवेत मोबाइल टॉयलेटच्या व्यवस्थेचे अभाव असल्याने त्यांना ‘निर्मल वारी’ संभव होऊ शकलेली नाही.‘हरित वारी’ साधली
राज्य शासनाच्या निर्देशानुसार निवृत्तिनाथ पालखीचे सर्व मानकरी आणि मंदिराचे विश्वस्त ही वारी हरित व्हावी, यासाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पाच रोपांचे वृक्षारोपण तसेच सीडबॉलचे वाटप करीत पुढे जात आहेत. त्यामुळे वारी खºया अर्थाने ‘हरित वारी’ करण्याचे नियोजन योग्यप्रकारे साध्य केले जात आहेत.त्र्यंबकपासून निघताना तीस हजारत्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी मंदिरापासून ही पालखी निघते, त्यावेळी त्यात सहभागी आसपासच्या गावांमधील दिंड्यांमधील वारकरी संख्या ही तीस हजारांच्या आसपास असते. नाशिकपर्यंत त्यात अजून काही दिंड्या सहभागी झाल्याने ती संख्या चाळीस हजारावर जाते. त्यात पुढे-पुढे जात ही संख्या गतवर्षीपर्यंत ८० हजारांपर्यंत जात होती.युवा वारकºयांमध्ये भरघोस वाढ
यंदाच्या वारीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखीत सहभागी वारकºयांची संख्या प्रथमच सव्वा लाखावर पोहोचली आहे. पाऊस लांबल्याने या बहुतांश भागातील पेरण्यादेखील लांबल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी थांबण्याऐवजी शेतकरी आणि युवावर्ग सहभागी होण्याचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
- पुंडलिक थेटे
निवृत्तिनाथ पालखी समन्वयक