तुषार, ठिबकसाठी मार्चपासून अनुदानच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:42+5:302020-12-12T04:31:42+5:30

चौकट - ५५ टक्के मिळते अनुदान सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के इतके ...

There has been no subsidy since March for snow, drip | तुषार, ठिबकसाठी मार्चपासून अनुदानच नाही

तुषार, ठिबकसाठी मार्चपासून अनुदानच नाही

Next

चौकट -

५५ टक्के मिळते अनुदान

सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के इतके अनुदान मिळते. तुषार सिंचनासाठी पाईपच्या आकारानुसार अनुदान ठरविले जात असून संपूर्ण संचासाठी १२०४५ रुपये अनुदान मिळते तर ठिबक सिंचनासाठी पीकनिहाय आणि अंतरानुसार होणारा खर्च गृहीत धरून अनुदान निश्चित केले जाते .

चौकट -

आधी स्वत:लाच करावा लागतो खर्च

सिंचन योजनेचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम कृषी विभागाची पूर्व संमती घेऊन स्वत: खर्च करून संच बसवून घ्यावा लागतो. त्यानंतर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी आदींकडून पाहणी केली जाते त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान वर्ग केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेस बराच कालावधी जात असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

आकडेवारी -

तुषार आणि ठिबक सिंचन अनुदान मिळालेले शेतकरी - ७१२३

अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेले शेतकरी - ३४१७

कोट -

तुषार आणि ठिबक सिंचनासाठी सर्वसाधारणपणे हेक्टरी अंदाजे २३ हजारांच्या आसपास अनुदान मिळत असते. जसजसे अनुदान उपलब्ध होत असते त्यानुसार शेतकऱ्यांना ते वितरित केले जाते. यामुळे कुणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही. अर्ज केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळेल.

- संजीवकुमार पडवळ, जिल्हा कृषी अधीक्षक

Web Title: There has been no subsidy since March for snow, drip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.