कमळावर निवडणुकीचा प्रस्तावच नाही ! - छगन भुजबळ
By धनंजय रिसोडकर | Updated: April 11, 2024 17:14 IST2024-04-11T17:13:31+5:302024-04-11T17:14:11+5:30
नाशिकच्या जागेची मागणी आमचे नेते अजीत पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलताना केली होती.

कमळावर निवडणुकीचा प्रस्तावच नाही ! - छगन भुजबळ
नाशिक : कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्तावच नाही तसेच अशा प्रकारच्या अफवांमध्ये काही तथ्यदेखील नाही. माझ्याशी तसे कुणी बोललेले नाही, मागणी नाही तसेच अटदेखील घातलेली नसल्याचे राष्ट्रवादी कँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात सांगितले.
नाशिकच्या जागेची मागणी आमचे नेते अजीत पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलताना केली होती. त्यावर त्यांनी ती जागा हवी असेल तर घ्या पण तिथून भुजबळ यांनाच निवडणूक लढवायला सांगावे, असे सांगितल्याचा संदेश मला मिळाला होता. मात्र, त्यानंतरच्या चर्चेत कुणीही माझ्याकडे कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह किंवा प्रस्तावही दिलेला नसून तशी कोणतीही अटदेखील घातलेली नाही. उमेदवाराच्या नावाची घोषणा ही तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून करणार आहेत. त्यामुळे ती घोषणा कधी होणार त्याबद्दल मला काही फारशी माहिती नाही.