कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!
By संजय पाठक | Published: March 9, 2024 05:49 PM2024-03-09T17:49:01+5:302024-03-09T17:52:01+5:30
आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते.
संजय पाठक, नाशिक : लाेकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार असून आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. मात्र, कधी राज ठाकरे बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज यांचे दौरे आणि कार्यक्रम त्यामुळे दोन दिवसांत ही भेट होऊ शकली नाही. आता मुंबईत ही भेट होण्याची शक्यता असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून लढा राष्ट्रहिताचा, संकल्प
शुद्ध राजकारणाचा या विषयावर मोहीम राबवत आहेत. या निवडणुकीत अशीच मोहीम
राबवण्याचे भक्त परिवाराने जाहीर केले आहे. सात मतदारसंघांत बाबाजी भक्त
परिवाराची मते निर्णायक ठरतील, असे परिवाराचे म्हणणे आहे.
मध्यंतरी बाबाजी भक्त परिवाराने पत्रकार परिषद घेतली तेव्हा शांतीगिरी महाराज यांनी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला होता. दरम्यान, ५ मार्च रोजी शांतीगिरी महाराज यांनी याच अनुषंगाने राज ठाकरे यांना नाशिक दौऱ्यात भेटण्याची वेळ मागितली हेाती. मात्र, नाशिक मध्ये कधी राज ठाकरे बैठकांमध्ये व्यस्त तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त त्यामुळे राज यांच्या नाशिक दौऱ्यात चर्चा होऊ शकली नाही. आता मुंबईत ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले.