सुखकर उन्हाळ्यासाठी दिनचर्येत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:04 AM2018-03-03T01:04:19+5:302018-03-03T01:04:19+5:30

थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.

There is a need for daily change for the summer of happiness | सुखकर उन्हाळ्यासाठी दिनचर्येत बदल आवश्यक

सुखकर उन्हाळ्यासाठी दिनचर्येत बदल आवश्यक

googlenewsNext

नाशिक : थंडी थंडी म्हणता उन्हाळा येऊन दाखल झाला असून, तपमानातही परिवर्तन व्हायला सुरु वात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. मात्र थंडी कमी झाली आणि ऊन पडू लागले म्हणजे उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता या मित्र ऋतूला जपून सामोरे जावे, असे आवाहन वैद्यकीय सूत्रांनी केले आहे. भरपूर पाणी (थंड नको), संतुलित आहार व उन्हापासून संरक्षण या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो. सध्या तप्त ऊन पहायला मिळत नसले तरी दिवसभर कडक ऊन पहायला मिळत आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याअगोदरच दिनचर्येत बदल करून उन्हाला तोंड देण्याची तयारी करणे गरजेचे आहे. ती केल्यास कडक उन्हाळा सुकर जाईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी
तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करते. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे. उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे टाळावे. संतुलित आहार घ्यावा. दिवसाची सुरु वात लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करणाºया टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे घ्यावीत. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजिरा या वस्तूंचे अधिक प्रमाणात सेवन करावे. सुती कपडे वापरावेत. गरज असेल तरच दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडावे. अन्यथा सकाळ-संध्याकाळच्या वेळेत आपली कामे पूर्ण करून घ्यावीत.
मार्चअखेरपर्यंत थांबा
थंडी कमी झाल्याने उन्हाळा सुरू झाला असा समज करून न घेता सध्या सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. सध्या वसंतऋतूची चाहूल लागली असली तरी पानगळही सुरू आहे. त्यामुळे सध्या मिश्र ऋतू सुरू आहे. अशा ऋतूत थंड पेये, आइस्क्रीम, नैसर्गिक थंड पेये पिण्याचा मोह टाळावा. कारण हे पदार्थ घेतल्यास फ्लू, अंगदुखी आदी आजार वाढण्याची शक्यता आहे. १५ मार्चनंतरच खºया अर्थाने उन्हाळा सुरू होणार असल्याने तेव्हाच उन्हाळ्याशी निगडीत गोष्टी करा-व्यात.
उन्हाळा सुरू झाल्याने या ऋ तूला अनुसरून दिनचर्या, आहार विहार असणे आवश्यक आहे. अति तिखट, अति थंड, अति तेलकट पदार्थ टाळावेत. सर्दी, खोकला, कफ होऊ देऊ नये. मधाचे, सुंठ्याचे पाणी प्यावे. ज्येष्ठमध खा. कोमट पाणी प्या. घरातून बाहेर पडताना सनक्रि न लोशन, स्कार्फ, समर कोट आदींचा वापर आवर्जून करावा. पाण्याचे प्रमाण वाढवावे.  - वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञ
ऋतूला अनुसरून दिनचर्या ठेवली तर उन्हाळ्याला घाबरण्याचे काही कारण नाही. या दिवसात चांगल्या दर्जाचे गॉगल, स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा. फ्रिजमधले पाणी पिण्यापेक्षा माठातले पाणी प्यावे. कार्बनयुक्त शीतपेये टाकून नैसर्गिक शीतपेये प्यावीत. बाहेर पडताना सोबत छत्री, पाण्याची बाटली, ग्लुकोज, लिंबूपाणी आवर्जून ठेवावे.
- डॉ. नरेंद्र पाटील, फॅमिली फिजिशियन

Web Title: There is a need for daily change for the summer of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक