ज्ञानाशिवाय जीवनात उत्सव नाही :  श्रीश्री रविशंकरजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:05 AM2019-10-31T00:05:51+5:302019-10-31T00:07:54+5:30

आपल्या क्षमतेनुसार परमेश्वर आपल्याला संकटे आणि समस्या देतो. ही संकटे एखाद्या प्राण्याच्या शेपटासारखी असतात. प्राणी जशी सहज आपली शेपटी पाहिजे तशी हलवू शकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्यदेखील आपल्या समस्यांवर मात करू शकतो. जीवनात उत्सव साजरे करायचे असेल तर ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानाच्या जोरावर मार्गक्र मण करत रहा, असा मंत्र द आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्रीश्री रविशंकरजी यांनी दिला.

There is no celebration in life without knowledge: Shri Ravi Shankarji | ज्ञानाशिवाय जीवनात उत्सव नाही :  श्रीश्री रविशंकरजी

ज्ञानाशिवाय जीवनात उत्सव नाही :  श्रीश्री रविशंकरजी

Next

नाशिक : आपल्या क्षमतेनुसार परमेश्वर आपल्याला संकटे आणि समस्या देतो. ही संकटे एखाद्या प्राण्याच्या शेपटासारखी असतात. प्राणी जशी सहज आपली शेपटी पाहिजे तशी हलवू शकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्यदेखील आपल्या समस्यांवर मात करू शकतो. जीवनात उत्सव साजरे करायचे असेल तर ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानाच्या जोरावर मार्गक्र मण करत रहा, असा मंत्र द आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्रीश्री रविशंकरजी यांनी दिला.
निमित्त होते, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने तपोभूमीच्या साधुग्राम मैदानावर आयोजित भाऊबीज-दीपावली मीलन सोहळ्याचे. भाऊबिजेच्या मुहूर्तावर दोनदिवसीय सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी (दि.२९) गणपती, अष्टलक्ष्मी हवनाने करण्यात आला.
या सोहळ्याला संपूर्ण राज्यातून रविशंकरजी यांच्या अनुयायांची अलोट गर्दी झाली होती. रविशंकरजी यांनी आपल्या प्रवचनाची सुरु वात माझे माहेर पंढरी... या भजनाने केली. भजनाच्या सुरु वातीला त्यांनी आपल्या खास शैलीत विठ्ठल विठ्ठल... च्या तालासुरात नामजप करताच उपस्थित भाविकांच्या जनसागराला जणू पंढरीत माउलीच्या दरबारात पोहचून आपण विठुरायाचे दर्शन करत असल्याचा अनुभव आला. त्यानंतर रविशंकरजी यांनी उपस्थित हजारो भक्तांना उद्देशून आपला संदेश देताना सांगितले, केवळ मनुष्यालाच संकटे, समस्यांचा सामना करावा लागतो, असे नाही तर भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांच्याही जीवनात संकटे होतीच.
समस्या कधीही डोंगराएवढी नसते, मनुष्य तिचा तसा विचार करतो आणि आपल्या मनात तसे स्वरूप निर्माण करून घेतो. मनुष्याने आपले ज्ञान वाढवून आध्यात्मिक शक्ती विकसित करायला हवी, असेही रविशंकरजी यावेळी म्हणाले. आपल्याकडून जे चांगले कर्म होऊ शकतात ते आवर्जून करावे, असा उपदेश त्यांनी यावेळी बोलताना केला.
प्रवचनाची सांगता रविशंकरजी यांनी उपस्थित भक्तांना दीपावली आणि भाऊबीजच्या शुभेच्छा देत केली.
व्यासपीठावर माजी मंत्री अनिल मोंढे, खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक मुर्तडक, आर्ट आॅफ लिव्हिंगचे समन्वयक विजय हाके, अविनाश आव्हाड, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंद यांसह मान्यवर उपस्थित होते.
२० हजार दिव्यांनी आरती
आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने उपस्थित भक्तांच्या जनसागरात दिव्यांचे ताट पोहोचवले गेले. यावेळी सुमारे २० हजार दिव्यांनी उपस्थित भाविकांनी श्रीश्री यांना अभिवादन केले. यावेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी मोबाइलची लाईट सुरू करत आरतीच्या ताटाप्रमाणे मोबाइल ओवाळीत लख लख चंदेरी... या भजनावर मुग्ध होऊन गुरूंना अभिवादन केले. यावेळी ४०० मीटरच्या रॅम्पवर चालत भक्तांमध्ये जाऊन त्यांनी पुष्पोत्सव करत आशीर्वाद दिले.
अयोध्याची गुड न्यूज लवकरच
प्रभू रामचंद्र यांच्या भूमीत त्यांचे राममंदिर निर्माणाचे देशाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. न्यायालयाचा याबाबत सुनावणीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. निकालाच्या रूपाने नागरिकांना ‘गुड न्यूज’ मिळेल, अशी अपेक्षा रविशंकरजी यांनी यावेळी व्यक्त केली.
नाशिकच्या कारागृहात कौशल्य विकास केंद्र
नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांसाठी लवकरच आर्ट आॅफ लिव्हिंग एक कौशल्य विकास केंद्र सुरू करत आहेत. त्यासाठी लागणारी कागदपत्रे सादर केली गेली आहे, अशी घोषणादेखील यावेळी व्यासपीठावरून करण्यात आली. यामुळे बंदिवानाना विविध कौशल्य आत्मसात करता येतील.
‘वेणुनाद’नंतर दुसऱ्यांदा तपोभूमीत...
श्रीश्री रविशंकर हे नाशिकमधील तपोभूमीत ‘वेणूनाद’नंतर दुसऱ्यांदा आले. यापूर्वी वेणूनाद संगीताचा कार्यक्र म झाला होता त्यावेळी श्री श्री नाशिकमध्ये येऊन आपल्या अनुयायांना भेटले होते.

Web Title: There is no celebration in life without knowledge: Shri Ravi Shankarji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.