गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:06 PM2020-01-22T23:06:53+5:302020-01-23T00:21:18+5:30

सहा वर्षांपूर्वी अनेक प्रयत्न करून मंजूर केलेल्या या क्रीडा संकुलाच्या कामात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही. कामाला गती देण्यासह समावेश नसलेल्या कामांचे तत्काळ प्रस्ताव तयार करा, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुका क्रीडा संकुलाच्या कामाच्या पाहणीदरम्यान केली.

There is no compromise on quality | गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड नको

क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी करताना माणिकराव कोकाटे. समवेत सीमंतिनी कोकाटे, ए.के. पाटील यांच्यासह अधिकारी.

Next
ठळक मुद्देमाणिकराव कोकाटे : आढावा बैठकीसह क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी

सिन्नर : सहा वर्षांपूर्वी अनेक प्रयत्न करून मंजूर केलेल्या या क्रीडा संकुलाच्या कामात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही. कामाला गती देण्यासह समावेश नसलेल्या कामांचे तत्काळ प्रस्ताव तयार करा, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुका क्रीडा संकुलाच्या कामाच्या पाहणीदरम्यान केली. त्याचबरोबर यावेळी झालेल्या आढावा बैठकीत आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रीडा संकुल साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगून तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.
मुसळगाव शिवारात सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामास कोकाटे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन अडीअडचणी जाणून घेण्यासह सूचनाही केल्या.
आढावा बैठकीस तहसीलदार राहुल कोताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ए. के. पाटील, शाखा अभियंता डी. के. बोडके, क्रीडा संकुलाचे आर्किटेक्ट अश्पाक यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंजूर झालेल्या साडेदहा कोटी रुपयांच्या निधीत रनिंग ट्रॅक, क्रि केटचे सुसज्ज मैदान, खो-खो, कबड्डी
आदी मैदाने तसेच कंपाउण्ड वॉल, पाण्याची टाकी आदींचा समावेश असल्याने या कामांना गती मिळाली आहे. मात्र इतरही महत्त्वाची कामे बाकी असून, या कामांसाठी अडीच कोटी रु पयांच्या निधीची गरज असून, त्याचे तत्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
क्रीडा संकुलातील एमआय टँकच्या जागेतून उत्खनन करत समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने गौण खनिजाची वाहतूक केली असल्याचे निदर्शनास आले. बदल्यात शासनास कुठल्याही प्रकारची रॉयल्टी भरली नाही. तसेच शासनाची रॉयल्टी बुडविणाºया या ठेकेदाराला नोटीस बजावण्याची सूचना कोकाटे यांनी कोताडे यांना केली.


राज्यात बालेवाडी क्रीडा संकुलानंतर सर्वात मोठी ५० एकराची जागा सिन्नरच्या क्र ीडा संकुलासाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मिशन व्हीजन संकुल संकल्पनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी सुमारे ६० कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या निधीची तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा आमदार कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: There is no compromise on quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार