कृषिपंपासाठी रक्कम भरूनही वीजजोडणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:07 AM2018-03-26T00:07:59+5:302018-03-26T00:19:48+5:30
एका दिवसात वीजजोडणी मिळेल, असे महावितरण वीज कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तीन वर्षांपूर्वीच कृषिपंपासाठी वीजजोडणी मिळावी यासाठी अनामत रक्कम भरूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. परंतु वीजजोडणी आधीच हातात वीज देयक मिळाले आहे. याप्रकरणी संबंधित शेतकºयाने ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली आहे.
नाशिक : एका दिवसात वीजजोडणी मिळेल, असे महावितरण वीज कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तीन वर्षांपूर्वीच कृषिपंपासाठी वीजजोडणी मिळावी यासाठी अनामत रक्कम भरूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. परंतु वीजजोडणी आधीच हातात वीज देयक मिळाले आहे. याप्रकरणी संबंधित शेतकºयाने ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली आहे. नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात वेलवंडी येथील महिला शेतकरी जयिता शॉ यांनी म्हटले की, आम्ही आमच्या शेतात तीन वर्षांपूर्वी विहीर खणली असून, त्यावर कृषिपंप वीजजोडणीसाठी अर्ज केला आहे. तसेच कोटेशन मिळाल्यावर वीजजोडणीची रक्कमही भरली. जून २०१५ पासून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. परंतु वीज देयक (बिल) मात्र हाती मिळाले. यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये अनेक चकरा मारूनही अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. याउलट शेतात विद्युत पोल टाकण्यासाठी दोन लाख रुपये देऊन पुन्हा साठ हजार रुपये भरण्यासाठी सांगण्यात आले. तरच वीजजोडणी मिळेल, असेही सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, कृष्णा गडकरी, जगन्नाथ गाडे आदींनी केली आहे.