शेतकरी संघटनांमध्येच संघटन नाही

By admin | Published: November 22, 2015 12:01 AM2015-11-22T00:01:53+5:302015-11-22T00:02:58+5:30

विष्णुपंत ताकाटे : पेन्शनधारकांचा मेळावा

There is no organization in the farming organization | शेतकरी संघटनांमध्येच संघटन नाही

शेतकरी संघटनांमध्येच संघटन नाही

Next

 पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांना ‘संघटीत’ करण्यासाठी अनेक संघटना जन्माला आल्या, परंतू या संघटनांमध्येच ‘संघटन’ नाही तर ते शेतकऱ्यांना काय न्याय मिळवून देणार, अशी टीका करत शरद जोशी यांच्या विचाराचा आदर्श ठेऊन अमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते विष्णूपंत ताकाटे यांनी केले.
निफाड तालुका ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने कारसूळ (ता. निफाड) येथे शनिवारी पेन्शनधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ताकाटे म्हणाले, ‘लाख मेले तरी चालतील पण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ असे म्हटले जाते. परंतू, हा पोशिंदा जगविण्यासाठी सरकार प्रयत्नच करत नसल्याची टीका ताकाटे यांनी केली.
आयटकचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले म्हणाले, सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी त्याचा फायदा फक्त आठ टक्के लोकांना होणार आहे. तर ९२ टक्के लोकांना त्याचा काडीमात्रही फायदा नाही, असे प्रतिपादन आयटकचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले. देसले म्हणाले, सेवानिवृत्त कामगारांना जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आपला लढा असा सुरू राहील. निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना जगण्यासाठी किमान साडेसहा हजार रु पये मिळावेत, अशी मागणी असतानाही शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे जगभरात एकमेव पेन्शनधारक आहेत की, ज्यांना पेन्शनच्या पैशांवर महागाई भत्ता मिळत नाही. जमा रकमेवरील व्याजाची रक्कम तर दूरच; पण साधी पेन्शनमधील वाढही शासनाला मान्य नसेल तर यापेक्षा दुर्दैव नाही, असा आरोप देसले यांनी सरकारवर केला.
आयटकचे कार्याध्यक्ष सुभाष काकड यांनीही सरकारवर तोफ डागत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी सरकारचे कपडे उतरवले जातील, असा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी प्रकाश जावडेकरांनी पेन्शनधारकांची फसवणूक केल्याचे सांगत पेन्शनधारकांच्या जीवावर निवडणुका जिंकल्याचे नमूद केले. देशभरात एक हजार रूपयांपेक्षा कमी पेन्शन असलेल्यांची संख्या 57 लाख असताना त्यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आयटकचे उपाध्यक्ष बापू रांगणेकर आणि खिजनदार प्रकाश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्र माचे मुख्य आयोजक निवृत्ती ताकाटे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी सादर केलेली पेन्शनधारकांची कविता उपस्थितांना चांगली भावली. कार्यक्र म यशस्वीतेसाठी संजय जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालक शंखपाळ गुरूजी यांनी केले.
मेळाव्याला ईपीएफ फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सरपंच रामकृष्ण कंक, उपसरपंच देवेंद्र काजळे, सोसायटी चेअरमन हनुमंत शंखपाळ, पाणी वापर संस्थेचे भाऊसाहेब शंखपाळ, जिल्हा सचिव डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष विलास विसपुते, संघटक चेतन पणेनर, उपाध्यक्ष नारायण आडणे, प्रवीण पाटील, खिजनदार प्रशांत देशमुख, सहसचिव एम. एन. लासुरकर, सुरेश कासार, भाऊसाहेब शिंदे, बळवंत जाधव यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)


कोट...
सैनिकांना वन रँक वन पेन्शन देण्यासाठी सरकारने १० हजार कोटी रु पये खर्च केले आहे. आम्हाला तीन हजार रूपये पेन्शन व महागाई भवा देण्यासाठी १४ हजार कोटी खर्च येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. परए आमचे 2 लाख कोटीहून अधिक रूपये सरकारकडे पडून आहेत मग अडचण कशाची आहे. इपीएफ १९९५ पेन्शनधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी पीएफ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
- राजू देसले, संस्थापक अध्यक्ष, आयटक

Web Title: There is no organization in the farming organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.