पार्किंगच नसल्याने शहरात कुठेही करा वाहने उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:10+5:302021-02-07T04:14:10+5:30
नाशिक : शहरात आधीच वाहनतळ कमी त्यात ते स्मार्ट सिटी कंपनीच्या ताब्यात घेऊन वसुली करण्याच्या नादात गोंधळ निर्माण झाला ...
नाशिक : शहरात आधीच वाहनतळ कमी त्यात ते स्मार्ट सिटी कंपनीच्या ताब्यात घेऊन वसुली करण्याच्या नादात गोंधळ निर्माण झाला असून सध्या नागरिक कुठेही, कसेही वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहन उभी कराल तीच पार्किंग अशी अवस्था झाली आहे. स्मार्ट सिटीचा ठेका वादात, वाहतूक पेालिसांचे टोईंग आणि दंडही बंद असल्याने शहरात चाैकाचौकात बिकट अवस्था झाली आहे.
नाशिक शहर चहबाजूने विकसित होत असून उपनगरांमध्येही बाजारपेठा वाढत असल्या तरी शहरात वाहनतळ कुठे असावे असे नक्की धोरण नाही. वाहनतळासाठी आरक्षित भूखंडांवर मूळ मालकांकडून विकसित करण्याच्या समावेशक आरक्षण तरतुदीचा लाभ घेऊन तेथे व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु वाहनतळच नामशेष झाले. सध्या शहरात महापालिकेने वाहनतळ तयार करण्याचे सोडून ऑन स्ट्रीट पार्किंगचा फंडा शोधला आहे. त्यामुळे नागरिक कुठेही रस्त्यावर वाहने उभी करीत असतील तर त्याच वाहनांकडून शुल्क वसुली करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार २८ ऑन स्ट्रीट तर पाच ऑफ स्ट्रीट पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, या जागा स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. या ठेकेदाराने महापालिकेला महिन्याला १७ लाख रुपये देण्याचा देकार दिला असला तरी आता त्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या संदीप हॉटेल समोरील खासगी बस उभ्या राहात असलेल्या वाहनतळाशिवाय एकाही वाहनतळावर शुल्क वसुली होत नाही. त्यातच पोलिसांची टोईंग व्हॅन बंद आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसही फार गांभीर्याने दंड वसूल करीत नाहीत.
कोट..
महापालिकेकडून सध्या पश्चिम विभागातील संदीप हॉटेल समोरील भूखंडावरील वाहनतळावर वसुली केली जाते. बाकी सर्व वाहनतळ सशुल्क वसुलीसाठी स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराकडे देण्यात आले आहेत. यात ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंगचा समावेश आहे.
इन्फो...
येथे वाहतुकीला अडथळा करत उभी वाहने
रविवार कारंजा, एमजी रोड, स्मार्ट रोड, सराफ बाजार, गोरे राम लेन, अहल्यादेवी होळकर मार्ग, त्र्यंबक नाका, ठक्कर बाजार, राका कॉलनी, थत्ते नगर, साधू वासवानी रोड, वडाळा डीजीपी नगर रोड, सातपूर येथील ईएसआय समोर, श्री गुरुजी रुग्णालयासमोर, नाशिकरोड येथील मुक्तीधाम, बिटको चाैक, रजीमेंटर समोर, पंचवटी कारंजा.
इन्फो...
३४, ८१४
मोटारींवर कारवाई,
७, ७२५
मोटारीचालकांकडून दंड वसूल
६८, ६२, ८००
दंडाची एकूण रक्कम
१५,४५,०००
दंड वसूल
५४,१७,८००
दंड वसूल होणे बाकी